अंकारा, दामास्कस : तुर्की (Turkey)आणि सीरियामध्ये (syria)7.8 रिश्टर तिव्रतेच्या भूकंपानंतर (Earthquake)मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झालीय. या भूकंपात आत्तापर्यंत किमान 521 हून अधिक जणांचा मृत्यू झालाय तर 2, 323 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. या भूकंपानं तुर्कस्तानसह सीरिया, लेबनॉन (lebanon)इस्रायल (israel)या शेजारील देशांनाही धक्के बसल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळं मृतांचा आकडा आणखी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवलीय.
तुर्कस्तानला आज (दि.6) सकाळी जोरदार भूकंपाचे धक्के बसले. यात 521 हून अधिक तुर्की नागरिकांचा (Earthquake in Turkey) मृत्यू झालाय, तर अनेक इमारती जमीनदोस्त झाल्याचं पाहायला मिळालंय. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनं मध्य तुर्कस्तानमध्ये झालेल्या या भूकंपाची तीव्रता 7.8 एवढी असल्याचं सांगितलंय.
या जोरदार भूकंपामुळं तुर्कीची राजधानी अंकारा आणि लेबनॉन, सीरिया, सायप्रससह शेजारील विविध शहरांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याचं पाहायला मिळतंय. आग्नेय तुर्कस्तानमधील गझियानटेपजवळ 7.8 तीव्रतेचा भूकंप झाल्याचं यूएस भूगर्भीय सेवेने सांगितलंय.
नूरदगीपासून 23 किलोमीटर पूर्वेला भूकंपाचं केंद्रस्थान होतं. भूकंपात आत्तापर्यंत 521 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालाय, तर अनेक इमारती कोसळल्याचं सॅनलिउर्फाचे महापौर यांनी सांगितलंय. तुर्कस्तानमधील या प्राणघातक भूकंपानंतर बचाव कार्य सुरु आहे.