Russia Earthquake : रशियामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. (Earthquake) भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7 इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू सुदूर पूर्वेकडील कामचटका द्वीपकल्पाचा किनारा होता. त्याचवेळी, युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेच्या अधिकाऱ्यांनी सुनामीचा इशारा दिला आहे. या भूकंपाचे व्हिडिओ समोर आले आहेत.
युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रशियामध्ये भूकंप सकाळी 7 वाजल्यानंतर आला. पेट्रोपाव्लोव्स्क-कामचत्स्की शहराच्या पूर्वेला सुमारे 90 किलोमीटर अंतरावर कामचटका द्वीपकल्पातील पाण्यात सुमारे 50 किलोमीटर (30 मैल) खोलीवर त्याचा केंद्रबिंदू होता. रशियाच्या युनिफाइड जिओफिजिकल सर्व्हिसच्या शाखेने त्यांच्या वेबसाइटवर सांगितले की, सुरुवातीच्या भूकंपानंतर अनेक धक्के नोंदवले गेले, परंतु त्यांची तीव्रता कमी होती.
द्वीपकल्प भूकंपीयदृष्ट्या सक्रिय प्रदेशात आहे ज्याला प्रशांत महासागराचा बराच भाग वेढला आहे, याला ‘रिंग ऑफ फायर’ म्हणूनही ओळखले जातं. तेथे 24 हून अधिक सक्रिय ज्वालामुखी आहेत. दरम्यान या भूकंपानंतर रशियात काय आणि किती जीवितहानी झाली आहे, याबाबतची आकडेवारी अद्याप समोर आली नाही.
शेअर बाजारात भूकंप! फ्युचर्स मार्केटसह आशियाई बाजारांमध्ये मोठी घसरण, काय आहे कारण?
शिवलुच ज्वालामुखीचा उद्रेक
सरकारी मालकीच्या TASS वृत्तसंस्थेने रशियन अकादमी ऑफ सायन्सेसच्या सुदूर पूर्व शाखेच्या ज्वालामुखी आणि भूकंपविज्ञान संस्थेचा हवाला देऊन म्हटलं आहे की, ज्वालामुखीने राख आणि लावा सोडण्यास सुरुवात केली होती. अहवालात शास्त्रज्ञांच्या हवाल्याने म्हटलं आहे की, शिवलुच ज्वालामुखीचा उद्रेक सुरू झाला आहे, व्हिज्युअल मूल्यांकनानुसार राखेचा प्लम समुद्रसपाटीपासून आठ किलोमीटर उंच होत आहे. दरम्यान, याआधी अमेरिकेच्या नॅशनल त्सुनामी वॉर्निंग सेंटरने भूकंपामुळे सुनामीचा धोका असल्याचे म्हटले होते. परंतु रशियाच्या आपत्कालीन मंत्रालयाच्या कामचटका शाखेने सुनामीचा धोका नसल्याचं सांगितल.
शियामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7 इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू सुदूर पूर्वेकडील कामचटका द्वीपकल्पाचा किनारा होता. #Russiaearthquake #earthquake pic.twitter.com/i9Sqc5Qigf
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) August 18, 2024