Economic Connection With Underwear And Lipstick : जागतिक अर्थव्यवस्थेवरील संकट ((Economic Crisis) हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुख्य बाजारपेठा, शेअर मार्केटचे आकडे, महागाई दर आणि जीडीपी ग्राफवर पाहण्याची आवश्यकता नसल्याचं अर्थतज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. सर्वसामान्य माणसांच्या दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील खर्चावरुन आपण बाजारपेठेत मंदी आली की नाही हे अनुमान ठरवू शकतो, असं अर्थतज्ज्ञांचं म्हणणं आहे. आता दैनंदिन वस्तूंमध्ये नेमक्या कोणत्या वस्तूंचा समावेश आहे, तुम्हाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पुरुषांची अंडवेअर आणि महिलांची लिपस्टिक खरेदीवरुन जागतिक मंदी आली की नाही? हे ठरवता येतं असा निष्कर्ष अर्थतज्ज्ञांनी काढलायं.
अमेरिकेचे फेडररल रिझर्व्ह बॅंकेचे माजी प्रमुख अॅल ग्रीनस्पॅन यांनी 1970 च्या दशकात एक वेगळीच थिअरी मांडली होती. अंडरवेअर एक अशी वस्तू की जी कुणी इतरांना दाखवत नाही. त्यामुळे लोकं आवश्यकतेनुसारच अंडरवेअर विकत घेतात. जेव्हा अर्थिक घडी बिघडते तेव्हा ग्राहक सर्वात आधी खरेदीवर ब्रेक लावत असल्याचं ग्रीनस्पॅन यांनी म्हटलंय.
नेपाळसह भारतात राजेशाही लागू करा; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मागणी…
2007-2009 साली अमेरिकेतली मोठ्या अर्थिक मंदीचे उदाहरण पुराव्यानिशी दिलं जातं. त्या काळात अंडरवेअरची विक्री मोठ्या घसरल्याचं चित्र होतं. त्यानंतर जशी अर्थिक घडी रुळावर आली, तशी विक्री वेगाने वाढली होती. त्यामुळे अंडरवेअर इंडेक्स हा एक मंदीचा गुप्त आणि महत्वाचा संकेत मानला जातो..
साधारणपणे देशात अर्थिक मंदी आल्यानंतर खरेदीवर त्याचा मोठा परिणाम होत असल्याचं दिसून येतं. Estee Lauder कंपनीचे चेअरमन लिओनार्ड लॉडर यांनी 2000 च्या मंदीच्या काळात पाहिलं की, महिलांनी महागडे कपडे, शूज, दागदागिने यावर कमी खर्च केला परंतू त्याच काळात लिपस्टिकच्या विक्रीत मुसंडी मारली. त्यामुळे या घटनेला लिपस्टिक इफेक्ट असं नाव देण्यात आलं होतं.
आता व्हॉट्सअपवर सरकारी सेवा अन् योजनांचं काम; लेटेस्ट व्हर्जनचं फडणवीसांकडून सूतोवाच
आता अर्थतज्ज्ञांच्या अनेक संशोधनानुसार कठीण काळात महिला स्वत:ला आनंदी ठेवण्यासाठी आणि आकर्षक दिसण्यासाठी स्वस्त पर्याय म्हणून मेकअपच्या साधनांमध्ये लिपस्टिकचा वापर अधिक करतात.
अंडरवेअर इंडेक्स अन् लिपस्टिक इफेक्टचा भारतावर काय परिणाम?
संशोधनानुसार जगासारखाच ट्रेंड भारतातही दिसून आला आहे. 2020 साली कोरोना काळात लॉकडाऊन होतं. या काळात कपडे आणि फॅशन उत्पादनांच्या विक्रीत मोठी घट झाल्याचं पाहायला मिळालं. तर दुसरीकडे कॉस्मेटिक्स, विशेषत: लिपस्टिकक आणि स्किनकेअर वस्तूंची मागणी स्थिर राहिली होती. तर पुरुषांच्या कपड्यांच्या, अंडवेअर मार्केटमध्ये विक्री मंदावल्याचं रिटेल असोशिएन ऑफ इंडियाने कबुली दिली.
दरम्यान, जगभरात अर्थव्यवस्थेचे चढ-उतार स्पष्ट होण्यासाठी शेअर मार्केट, बाजारपेठांच्या व्यवहारांची आकडेवारी, जीडीपी, हे पुरेसे नसतात. तर अंडरवेअर इंडेक्स आणि लिपस्टिक इफेक्ट अशा वस्तू संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेची खरी नाडी सांगू शकतात.