Elon Musk सोडणार ट्विटरचं सीईओ पद, ‘ही’ असणार नवी सीईओ

Elon Musk leave as Twitter CEO : मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत. यामध्ये युझर्सच्या व्हेरीफाईड अकाऊंटची ओळख असलेल्या ब्लू टीक बाबात त्यांनी गेल्याकाही दिवसांपूर्वीच महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता त्यांनी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एलॉन मस्क आता ट्विटरचे सीईओ पद सोडणार आहेत. […]

elon musk twitter_LetsUpp

elon musk twitter_LetsUpp

Elon Musk leave as Twitter CEO : मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत. यामध्ये युझर्सच्या व्हेरीफाईड अकाऊंटची ओळख असलेल्या ब्लू टीक बाबात त्यांनी गेल्याकाही दिवसांपूर्वीच महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता त्यांनी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एलॉन मस्क आता ट्विटरचे सीईओ पद सोडणार आहेत. त्यांच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

एलॉन मस्क आता ट्विटरचे सीईओ पद सोडणार आहेत. मग आता ट्विटरचे सीईओ कोण असणार असा देखील प्रश्न अनेकांना पडला असेल. याचं देखील उत्तर मिळालं आहे. कारण एलॉन मस्क यांनी एक ट्विट करत आपण ट्विटरचे सीईओ पद सोडणार असल्याचं जाहीर केलं. याच ट्विटमध्ये त्यांनी ट्विटरचे आगामी सीईओ कोण असणार याचं उत्तर दिलं आहे.

एलॉन मस्क यांनी लिहिले की, मला सांगायला आनंद होत आहे की, मी ट्विटरच्या सीईओ पदासाठी एक व्यक्ती नियुक्त केली आहे. ती पुढील आठवड्यात पदभार स्विकारेल. तर आता मी कार्यकारी अध्यक्ष आणि CTO, उत्पादन, सॉफ्टवेअर आणि sysops देखरेख ही भूमिका पार पाडणार आहे.

आता ट्विटरने व्हॉट्सअॅपचे टेन्शन वाढविले ! नवीन फीचर कोणते आले ?

त्यामुळे एलॉन मस्क त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी एका महिलेला ट्विटरच्या सीईओ पदासाठी नियुक्त केले आहे. मात्र ही महिला कोण असणार हे मात्र त्यांनी यामध्ये सांगितलेलं नाही. त्यामुळे ती महिला कोण याची उत्सुकता नेटकऱ्यांमध्ये वाढली आहे.

Exit mobile version