Download App

‘एक बिलियन डॉलर देतो पण नाव बदला’; Elon Musk ची थेट विकिपीडियाला ऑफर

Elon Musk : टेस्लाचे मालक एलन मस्क (Elon Musk) यांनी एक्स खरेदी केल्यानंतर आता तंत्रज्ञान विश्वात उंच उडी घेत असल्याचं दिसून येत आहे. कारण नूकतंच एलन मस्क यांनी विकिपीडियाला ऑफर दिली आहे. आता एलन मस्क विकिपीडियाल खरेदी करण्याच्या मार्गावर आहेत. विकिपीडियाला एक बिलियन डॉलर देतो पण नाव बदला, अशी ऑफर दिल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भातील पोस्ट मस्क यांनी एक्सवर शेअर केली आहे.

मागील अनेक दिवसांपासून एलन मस्क काही ना काही कारणांमुळे चर्चेत आहेत. सध्या मस्क यांची एक्सवरील पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यांच्या या पोस्टमध्ये, मस्क विकिपीडियाला एक अब्ज डॉलर्स ऑफर करताना दिसत आहे.

Nitesh Rane : मराठा समाजाचा खरा ‘व्हिलन’ उद्धव ठाकरे; आरक्षणावरून नितेश राणेंचा घणाघात

एलन मस्क यांनी विकिपीडियाने त्याचे नाव बदलावे असे वाटते. एवढेच नाही तर मस्कने विकिपीडियासाठी नवीन नावही सुचवले आहे. मस्क यांनी विकिपीडियाला एक बिलियन डॉलरची ऑफर दिली खरी पण नाव बदलण्यासाठी अटही घातली आहे.

Shraddha Kapoor Post: ह्रतिक रोशनच्या ‘क्रिश4’ मध्ये झळकणार श्रद्धा कपूर?

मस्क यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये विकिपीडियाचं नाव बदलण्याबाबत बोलत आहेत. विकिपीडियाने नाव बदललं तर एक बिलियन डॉलरची ऑफर देणार असल्याचं मस्क यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Bacchu Kadu : बच्चू कडू अयोध्येला जाणार; दौऱ्याचं कारणही सांगून टाकलं

आता एलन मस्क यांनी दिलेल्या ऑफरबद्दल अद्याप विकिपीडियाकडून कोणतंही प्रत्युत्तर मिळालेलं नाही. मात्र, विकिपीडियाने पुढील काळात मस्क यांची ऑफर स्विकारल्यास मस्क विकिपीडियाचं नेमकं काय नाव ठेवतील? हे पाहणं महत्वाचं ठरेल.

दरम्यान, विकीपीडियाने एलन मस्क यांची ऑफर स्विकारल्यास विकीपीडियाला पुढील एक वर्षांपासून नाव बदलावं लागणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us