Bacchu Kadu : बच्चू कडू अयोध्येला जाणार; दौऱ्याचं कारणही सांगून टाकलं

Bacchu Kadu : बच्चू कडू अयोध्येला जाणार; दौऱ्याचं कारणही सांगून टाकलं

Bacchu Kadu : राज्य सरकारमधील सत्ताधारी शिंदे गटाचे सहकारी आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आता अयोध्या दौरा करणार आहेत. येत्या 29 ऑक्टोबर रोजी आमदार कडू अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. राज्यातील राजकारणाची सध्याची स्थिती पाहता त्यांच्या या दौऱ्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 15 ऑक्टोबरला मुंबईत मेरा देश मेरा खून या मोहिमेची सुरुवात केल्यानंतर या मोहिमेचा दुसरा टप्पा अयोध्येत होणार आहे, अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे व्हावीत. यासाठी आम्ही अयोध्येला जात आहोत. शेतकऱ्यांचे आणि शेतमजुरांसाठी आर्थिक आरक्षण निर्माण व्हावे यासाठी देखील आमची लढाई असणार आहे. आमचे आंदोलन सरकारच्या विरोधात आगे की सरकारच्या बाजून हे सरकारनेच शोधावे. आम्ही मागणी करत आहोत. सरकारमध्ये आहोत म्हणून मागणी करू नये असा काही कायदा नाही. सरकारला वाटले की हे आंदोलन विरोधात आहे तरी त्याची तमा आम्हाला नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी सरकारला दिला.

BJP : ‘तुमच्या याच प्रवृत्तीमुळे संपूर्ण पक्ष फुटला’; बावनकुळेंवरील पवारांची टीका भाजपला झोंबली

सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने घ्यावेत यासाठी हा दौरा आहे. आम्ही आर्थिक आरक्षणाची लढाई लवकरच सुरू करू. त्यासाठी आम्ही संपूर्ण भारत फिरणार आहोत. आम्ही हजारोंच्या संख्येने अयोध्येला जाणार आहोत. या सरकारला बुद्धी दे अशी प्रार्थना आम्ही प्रभू श्रीरामाकडे करू. देवाला कापूस, ऊस, संत्र, सोयाबीनचा नैवेद्य अर्पण करणार आहोत. राष्ट्रवादी किसान दलाने आम्हाला आमंत्रित केले आहे, असे कडू म्हणाले.

सध्या बच्चू कडू हे सातत्याने सरकारविरोधात भूमिका मांडताना दिसत आहेत. यावेळी देखील त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकारच्या कारभारावर संताप व्यक्त केला. आम्ही जे आंदोलन केलय ते सरकारच्या बाजूने आहे की त्यांच्या विरोधात याचं उत्तर सरकारनेच शोधावं. संत्र्याचा मुद्दा हा केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे. बांग्लादेश संत्र्यावर आयात शुल्क लावत असेल तर त्यांच्या मालावर सुद्धा आपण आयात कर लावला पाहिजे, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली.

मराठा आरक्षणाला EWS चा पर्याय दिला का? शिंदे सरकारच्या शासकीय जाहिरातीवर चव्हाणांचा सवाल

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube