एलॉन मस्क बनले जगातील पहिले ट्रिलेनियर! 75 अब्ज डॉलर्स उभारत Space X ही ठरला जगातील सर्वात मोठा आयपीओ

Elon Musk world's first trillionaire एलॉन मस्क हे जगातील पहिले ट्रिलेनियर म्हणजेच एक लाख कोटी डॉलरपेक्षा अधिक संपत्ती असलेले व्यक्ती ठरले.

Elon Musk world's first trillionaire

Elon Musk world's first trillionaire

Elon Musk world’s first trillionaire SpaceX emerges as world’s largest IPO raising $75 billion : जगातील सर्वात मोठ्या आयपीओचा विक्रम रचत एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने इतिहास घडवला आहे. स्पेसएक्सने तब्बल 75 अब्ज डॉलर उभारले असून, यामुळे कंपनीचे मालक आणि जगातील मोठे उद्योजक एलॉन मस्क हे आता जगातील पहिले ट्रिलेनियर म्हणजेच एक लाख कोटी डॉलरपेक्षा अधिक संपत्ती असलेले व्यक्ती ठरले आहेत.

नात्याची ट्विस्टेड गोष्ट ​सांगणारा ‘कप बशी कप बशी’ चित्रपटाचा रंजक ट्रेलर लाँच

मस्क (Elon Musk) यांच्या एरोस्पेस कंपनी स्पेस एक्स (SpaceX) ने अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशन (SEC) मध्ये हा आयपीओ आणला जो शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ ठरला आहे. कंपनीने 1.75 ट्रिलियन ते 2 ट्रिलियन डॉलर (सुमारे ₹163 लाख कोटी ते ₹193 लाख कोटी) इतक्या प्रचंड मूल्यांकनाचे लक्ष्य ठेवले होते. तसेच या आयपीओद्वारे सुमारे 75 अब्ज डॉलर (₹7.25 लाख कोटी) भांडवल उभारले आहे. हा आयपीओ यशस्वी ठरल्याने त्याने तो 2019 मध्ये झालेल्या Saudi Aramco च्या विक्रमी आयपीओलाही मागे टाकले आहे.

कार्यतत्पर डॉक्टर, निष्क्रिय ग्रामीण आरोग्य केंद्र आणि अमर्यादित आव्हाने: प्राइम व्हीडिओतर्फे ग्राम चिकित्सालय सीझन टू ट्रेलर प्रसिद्ध

एलॉन मस्क यांची अवकाश संशोधन क्षेत्रातील कंपनी स्पेसएक्स आता सार्वजनिक कंपनी बनण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकत आहे. यामुळे जागतिक गुंतवणूकदारांसह भारतीय गुंतवणूकदारांसाठीही नव्या संधी निर्माण होऊ शकतात. स्पेसएक्सचे मुख्य उद्दिष्ट रॉकेट तंत्रज्ञान अधिक प्रगत करणे आणि अवकाश प्रवास अधिक सुलभ व स्वस्त बनवणे हे आहे. कंपनीच्या महत्त्वाकांक्षी योजनांमध्ये मंगळ ग्रहावर मानवी वसाहत उभारण्याचाही समावेश आहे. त्यामुळे स्पेसएक्स ही केवळ व्यावसायिक कंपनी नसून अवकाश संशोधनातील नव्या युगाची सुरुवात करण्याचा प्रयत्न करत आहे.

 

Exit mobile version