European Airlines Reroute Flights To Avoid Pakistan Airspace : भारत आणि पाकिस्तानमधील (India Pakistan Tension) अलिकडच्या तणावामुळे पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर पावले उचलली, ज्यात आयातीवरील बंदी आणि हवाई क्षेत्र बंद करणे समाविष्ट होते. भारतानंतर इतर काही देशांनी देखील पाकिस्तानी हवाई हद्द टाळण्याचा निर्णय घेतलाय.
भारताने हल्ला केल्यास अण्वस्त्रांनी प्रत्युत्तर, पाकिस्तानची धमकी, कोण काय म्हणालं?
आता युरोपियन विमान कंपन्याही (European Airlines) पाकिस्तानच्या हवाई हद्दीपासून दूर राहत असल्याचं समोर आलंय. यामुळे पाकिस्तानची (Pakistan Airspace) आंतरराष्ट्रीय प्रतिमा आणि आर्थिक स्थिती प्रभावित होण्याची दाट शक्यता आहे.
‘या’ देशांनीही पाकिस्तानी हवाई हद्द टाळली
लुफ्थांसा, ब्रिटिश एअरवेज, स्विस, आयटीए एअरवेज आणि लॉट पोलिश एअरलाइन्स सारख्या प्रमुख युरोपीय कंपन्यांनी त्यांचे उड्डाण मार्ग बदलले आहेत. त्यांनी पाकिस्तानवरून उड्डाण करणे बंद केले आहे. फ्लाइटराडार 24 नुसार, हा बदल 30 एप्रिलपासून दिसून येत आहे. 2 मे पासून या विमान कंपन्यांनी पाकिस्तानवरून उड्डाण करणे पूर्णपणे बंद केले आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कोणीही निर्णय घेऊ शकत नाही; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
या बदलांमुळे प्रवाशांना जास्त वेळ उड्डाणांचा सामना करावा लागत आहे. उदाहरणार्थ, म्युनिक-दिल्ली, फ्रँकफर्ट-मुंबई, फ्रँकफर्ट-हैदराबाद आणि बँकॉक-म्युनिक सारख्या लुफ्थांसा विमान कंपन्या आता पाकिस्तानला बायपास करत आहेत. त्याचप्रमाणे LOT पोलिश एअरलाइन्सच्या वॉर्सा-दिल्ली आणि ITA एअरवेजच्या रोम-दिल्ली विमानांनाही पाकिस्तानमार्गे वळवण्यात आले आहे.
हा निर्णय का घेण्यात आला?
सुरक्षेच्या चिंता आणि प्रादेशिक तणावामुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. याचा पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर आणि आर्थिक परिस्थितीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, कारण हवाई क्षेत्र शुल्क आणि वाहतूक सुविधांमधून मिळणारे उत्पन्न कमी होऊ शकते. या घडामोडींवरून स्पष्ट होते की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने उचललेल्या पावलांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर परिणाम होत आहे. पाकिस्तानला राजनैतिक आणि आर्थिक आघाड्यांवर आव्हानांचा सामना करावा लागत आहे.