Download App

कतारमध्ये इंडियन नेव्हीच्या अधिकाऱ्यांच्या फाशीची शिक्षा; 50 वर्षांच्या नातेसंबंधावर येणार गदा?

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

दोहा : कतारमध्ये काल (दि. 26) भारतीय नौदलाच्या (India Navy) 8 माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामुळे दोन्ही देशांच्या 50 वर्षांच्या नात्यात कटूता येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कतार (Qatar) हा आखातातील एक छोटासा देश जरी असला तरी, भारतासाठी तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो. नेमके भारत आणि कतार देशातील नातेसंबंध कसे आहेत या फाशीचा दोन्ही देशांच्या संबंधांवर नेमका कसा परिणाम होईल हे आपण जाणून घेऊया. (Ex Indian Navy Officers Death Penalty  In Qatar Know India Qatar Relationship )

‘फडणवीसांनी मनावर घेतल्यावरच आरक्षण मिळणार? भास्कर जाधवचा CM शिंदेंवर निशाणा

कतार भारताचे राजकीय नाते 50 वर्ष जुने

कतार हा आखातातील एक छोटासा देश आहे पण भारतासाठी महत्त्वाचा आहे. भारत-कतार यांच्यातील राजकीय संबंध जवळपास 50 वर्षे जुने आहेत. नौदलाच्या आठ माजी भारतीय अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर कतार अचानक चर्चेत आला आहे. भारत-कतार राजकीय संबंध 1973 मध्ये सुरू झाले असून, ही मैत्री 50 वर्षे जुनी आहे. हा मोठा काळ असून, अशा परिस्थितीत आपल्या फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या माजी अधिकाऱ्यांना सुखरूप परत आणण्याचे आव्हान भारतीय सरकारसमोर आहे.

भारत-कतार संबंध कसे आहेत?

कतारचे अमीर आणि भारताच्या पंतप्रधानांनीही एकमेकांच्या देशांना भेटी दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही कतारला गेले आहेत. उपराष्ट्रपती आणि परराष्ट्रमंत्रीही कतारला गेले आहेत. या भेटी दोन्ही देशांमधील नातेसंबंध किती घनिष्ट आहेत हे दर्शवते. याशिवाय भारताचे व्यापारी संबंधही कतारसोबत मजबूत आहेत. त्यामुळे दोन्ही देशांधील जुने राजकीय संबंध बघता माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा देणे दोन्ही देशांमधील भविष्यातील नातेसंबंधासाठी योग्य ठरणार नसल्याचे मत काही राजकीय जाणाकार व्यक्त करत आहेत.

Israel Hamas War : …म्हणून हमासचा इस्त्रायलवर हल्ला, थेट भारताशी कनेक्शन; बायडेन यांचा दावा

कोणत्या वस्तू आयात आणि निर्यात केल्या जातात?

एकटा कतार भारताला 80 टक्के गॅस पुरवतो. भारतातून धान्य, दागिने, धातू, भाजीपाला, कपडे, बांधकाम साहित्य इत्यादी नियमितपणे कतारला पाठवले जातात. कतारमध्ये जवळपास एक चतुर्थांश लोकसंख्या भारतीय असून, हे सर्व नागरिक कामानिमित्त कतार येथे गेलेले आहेत. त्यामुळे अशाप्रकारे कतारच्या प्रगतीत भारतीय नागरिकांचा हातभार मोठा आहे. कतारची एकूण लोकसंख्या सुमारे 30 लाख आहे आणि यापैकी 7.5 लाख भारतीय आहेत.

अल बहर युद्धाभ्यास नेमका काय?

दोन्ही देशांमधील व्यापार 15 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त असून, कतारने भारतातील गुंतवणुकीसाठी एक विशेष टास्क फोर्सदेखील स्थापन केला आहे. जो कतार गुंतवणूक प्राधिकरणाच्या देखरेखीखाली काम करतो. कतार रस्ते, विमानतळ, बंदरे आणि इतर पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे तर, भारत कतारमध्ये खत, नैसर्गिक वायू, रासायनिक उद्योग इत्यादी उभारण्यास इच्छूक आहे. यासाठी दोन्ही देशांमध्ये अलीकडच्या काळात अनेक करारही झाले आहेत, जे भविष्यात मैलाचे दगड ठरू शकतात.

वरील बाबींशिवाय कतारसोबत भारताचे संरक्षण करारही आहे. या अंतर्गत झैर अल बहर नावाचा युद्ध सराव दरवर्षी केला जातो. ज्यामध्ये दोन्ही देशांच्या नौदलाचे अधिकारी आणि जवान सहभागी होतात. कतारमध्ये डझनहून अधिक भारतीय शाळा आहेत ज्या CBSE माध्यमातून 30 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत.

Hardik Pandya : टीम इंडियाला धक्का! हार्दिक पांंड्या वर्ल्डकपमधून आऊट?

कतारच्या टीकेनंतर भाजप नेत्याची हकालपट्टी

कतार हा पहिला देश होता ज्याने भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर कठोर टिप्पणी केली होती. त्या टिप्पणीचा आदर करत भाजपने नुपूर शर्मा यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.

शिक्षा सुनावण्यात आलेले माजी 8 अधिकारी कोण? 

हेरगिरीच्या आरोपाखाली ऑगस्ट 2022 मध्ये अटक करण्यात आलेल्या भारतीय नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांमध्ये कमांडर पूर्णेंदू तिवारी, कमांडर सुगुणाकर पकाला, कमांडर अमित नागपाल, कमांडर संजीव गुप्ता, कॅप्टन नवतेज सिंग गिल, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कॅप्टन सौरभ वशिष्ठ आणि नाविक रागेश गोपकुमार यांचा समावेश आहे. या सर्वांनी भारतीय नौदलात 20 वर्षांपर्यंतचा विशिष्ट सेवा पूर्ण केली आहे. तसेच त्यांनी सैन्यात प्रशिक्षक म्हणून महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. 2019 मध्ये, कमांडर पूर्णेंदू तिवारी यांना प्रवासी भारतीय सन्मान प्रदान करण्यात आला, जो परदेशी भारतीयांना दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. हे सर्व अधिकारी इस्रायलसाठी हेरगिरी करत असल्याचा दावा कतार सरकारने केला आहे.

अल दाहरा कंपनीत करत होते काम 

प्रकाशित मीडिया रिपोर्ट्सनुसार, निवृत्तीनंतर हे सर्व नौदलाचे माजी अधिकारी कतार येथील अल दाहारा या खासगी कंपनीत काम करत होते. ही कंपनी कतारी एमिरी नौदलाला प्रशिक्षण आणि इतर सेवा पुरवते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीचे नाव Dahra Global Technology and Consultancy Services असल्याचे सांगितले जात आहे.

Maratha Reservation | मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर पाच पर्याय कोणते? LetsUpp Marathi

Tags

follow us

वेब स्टोरीज