Facebook Instagram down : काही तांत्रिक अडचणींमुळे जगभरातील इस्टाग्राम, फेसबुक अन् थ्रेडचं सर्व्हर डाऊन ( Facebook Instagram down ) झालं होत. फेसबुक आणि इंस्टाग्राम अचानक डाऊन झाल्याने लाखो यूजर्स हैराण झाले होते. तर दुसरीकडे तब्बल एक तास फेसबुक, इंस्टाग्राम आणि थ्रेड या मेटाच्या सर्विसेस डाऊन झाल्याने कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांचं लाखो डॉलर्सचे नुकसान झालं आहे.
रिलीज आधीच Shaitaan हाऊसफुल्ल? आतापर्यंत झालं इतकं अँडवान्स बुकींग
कारण मेटाचे हे तीनही प्लॅटफॉर्म अचानक डाऊन झाल्याने युजर्स यातील कोणत्याही साइट्स वापरू शकत नव्हते. फेसबुकवर तर युजरचे अकाउंट थेट लॉग आऊट होत होते. हा सर्व प्रकार तब्बल एक तास सुरू होता. यादरम्यान झुकरबर्ग यांनी ट्विट करत सर्व काही लवकरच सुरवात होणार असल्याचे देखील सांगितलं होतं.
Jayant Patil : “शरद पवारांची ताकद मोठी म्हणून अमित शाह”… जयंत पाटलांचं सणसणीत उत्तर
मात्र या डाऊनमुळे कंपनीचं मोठं नुकसान झालं. वीबुश सिक्योरिटीजचे मॅनेजिंग डायरेक्टर डॅन इव्स यांनी सांगितलं की, मेटाच्या हे तीनही प्लॅटफॉर्म डबल एक तास डाऊन असल्याने त्यामुळे कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांचा 3 बिलियन डॉलरचे नुकसान झाला आहे. तर तज्ज्ञांनी सांगितलं की, मेटाच्या शेअरची किंमत देखील यामुळे घटली. ज्यामध्ये तब्बल एक पॉईंट सहा टक्के घसरण झाली.तर मार्क झुकरबर्ग यांच्या संपत्ती बद्दल सांगायचं झालं तर फोर्ब्सच्या रियल टाईम बिलेनिअर्सच्या यादीमध्ये मार्क झुकरबर्ग हे जगातील पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. ज्यांची एकूण संपत्ती 139.1 बिलियन डॉलर एवढी आहे.
तर दुसरीकडे मेटाचे फेसबुक, इन्स्टा, थ्रेड असे सगळेच प्लॅटफॉर्म डाऊन झाल्याने तिकडे म्हणजेच एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे मालक एलन मस्क यांनी झुकरबर्ग यांच्या मेटा कंपनीला टोला लागावला. मस्क यांनी ट्विट करत म्हटलं की, तुम्ही ही पोस्ट वाचू शकत आहात त्याचं कारण आमचे सर्व्हर काम करत आहेत. तसेच जगभरातील युजर्स करून ट्विटरवर मीम्सचा वर्षाव करण्यात आला. तर या सर्व प्रकारामुळे मेटाचे अधिकारी एंडी स्टोन यांनी मेटाच्या सर्विसेस डाऊन झाल्याने युजरची माफी मागितली.