मोठी बातमी! व्हाईट हाऊसबाहेर अंदाधुंद गोळीबार; हल्लेखोर ठार

White House Firing  : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. माहितीनुसार

White House Firing 

White House Firing 

White House Firing  : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. माहितीनुसार, रविवारी भारतीय वेळेनुसार, सकाळी व्हाईट व्हाऊस बाहेर तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर एका व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केली. सध्या या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. घटनास्थळी तब्बल 25 ते 30 गोळ्या झाडल्या गेल्या असं देखील सांगण्यात येत आहे.

तर दुसरीकडे या हल्ल्यात कोणताही पोलीस अधिकारी जखमी झाला नसून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प (Donald Trump) यांच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या ‘सीक्रेट सर्व्हिस’च्या (Secret Service) अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत, हल्लेखोर ठार झाला आहे.

ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये उपस्थित

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, ज्या वेळी हा गोळीबार झाला, त्या वेळी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व्हाईट हाऊसच्या (White House) आतच उपस्थित होते. गोळीबाराचा आवाज कानी पडताच, त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या ‘सीक्रेट सर्व्हिस’च्या पथकाने तत्काळ हालचाली करत संपूर्ण व्हाईट हाऊस परिसर सुरक्षित केला. अखेर ‘सीक्रेट सर्व्हिस’नेच त्या हल्लेखोराचा खात्मा केला. गोळीबाराचे वृत्त मिळताच, ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’चे (FBI) पथकही घटनास्थळी धावून आले. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी FBI चे संचालक काश पटेल स्वतः घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर त्यांनी ‘X’  या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टद्वारे या गोळीबाराच्या घटनेला दुजोरा दिला.

 स्नेहभोजनाच्या कार्यक्रमादरम्यान हल्ला

एप्रिल महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस येथे आयोजित केलेल्या   स्नेहभोजनाच्या कार्यक्रमादरम्यान देखील हल्ला झाला होता. तेव्हा ट्रम्प यांच्यासह त्यांची पत्नी मेलानिया, उपराष्ट्राध्यक्ष पेन्स, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांचाही सहभाग होता. व्हाईट हाऊसजवळच असलेल्या ‘हिल्टन हॉटेल’मध्ये हे स्नेहभोजन सुरू असताना, अचानक एका व्यक्तीने गोळीबार सुरू केला, ज्यामुळे उपस्थितांमध्ये एकच घबराट उडाली.

‘या’ राशींना आर्थिक लाभ मिळणार; जाणून घ्या सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा राहणार?

Exit mobile version