America-Iran War : ही वादळापूर्वीची शांतता…डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला धमकी दिलीयं. इराणला परिणाम भोगावे लागेल, अशी थेट धमकी ट्रम्प यांनी दिलीयं.
America-Iran War : अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये शांतता करार न झाल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला धमकी दिल्याचं समोर आलंय. ही वादळापूर्वीची शांतता असून शांतता करार झाला नाही तर परिणाम भोगा, अशी थेट धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलीयं. तर दुसरीकडे इराणकडूनही ट्रम्प यांच्या धमकीला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंयं. त्यामुळे आता पुढील काही दिवसांत दोन्ही देशांमध्ये युद्ध भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अंबानींचे सर्वात मोठे नुकसान ! देशातील टॉपच्या दहा कंपन्यांचे मार्केट कॅप 3 लाख कोटींनी घटले !
दोन्ही देशांमध्ये युद्ध पुन्हा भडकणार असल्याचं दिसून येत आहे. युद्ध भडकण्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी एक प्रकारे इराण देशाला थेट इशाराच दिल्याचं सांगितलं जात आहे. डोनाल्ड ट्र्म्प यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले, ही वादळापूर्वीची शांतता, शांतता करार झाला नाही तर परिणाम भोगा, इराणला वाईट परिणामांना सामोरं जावं लागणार असल्याची धमकीच ट्रम्प यांनी दिली आहे.
तर दुसरीकडे इराण अमेरिकेच्या या धमकीला न जुमानता जोरदार प्रत्युत्तर दिलंय. इराणचे राष्ट्राध्यक्ष अब्बास अराघची म्हणाले, अमेरिकेला आम्ही जशास तसं उत्तर देऊ, इराणी सैन्य संघर्ष करण्यासाठी तयार असून जग आता एका नव्या व्यवस्थेच्या उंबरठ्यावर असल्याचं प्रत्युत्तर अब्बास अराघची यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दिलंय. त्यामुळे आता दोन्ही देशांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून संघर्ष तापणार असल्याचं चित्र आहे.
पार्थ पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला अन् पाऊण तास चर्चा; राज्यात पुन्हा राजकीय भूकंप?
दरम्यान, अमेरिकेचे 11 एअरफोर्स सी 17 ए विमान मध्य आशियाहून युरोपच्या दिशेने रवाना झाले. 28 फेब्रुवारीच्या हल्ल्यापूर्वी अशाच घडामोडी घडताना दिसून आल्या होत्या. अहवालानूसार अमेरिका आणि इस्त्रायलच्या सैन्य अधिकाऱ्यांकडून मोठ्या हल्ल्याची तयारी केली जात आहे. पेंटागनने काही प्लॅन आखली आहेत. या हल्ल्यात युरेनियम भंडारला टार्गेट केले जाणार असल्याची माहिती आहे. 12 दिवसांच्या युद्धात अमेरिकेने इराणच्या परमाणु ठिकाणे नष्ट केली. मात्र, युरेनियम जमिनीच्या खाली आहे. अशा परिस्थितीमध्ये अमेरिका आपले सैन्य इराणच्या जमिनीवरही उतरू शकते. चीनच्या दाैऱ्याहून आल्यावरही डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट इराणला धमकी दिलीयं.