Download App

राजकारणात मोठी खळबळ : परराष्ट्र मंत्री बेपत्ता; प्रसिद्ध न्यूज अँकरसोबत पळून गेल्याचा संशय

Qin Gang : येथील कम्यूनिस्ट पक्षाने परराष्ट्र मंत्री किन गँग यांची मंत्रीपदावरुन हकालपट्टी केली आहे. किन गँग यांची गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र 25 जूनपासून ते सार्वजनिक जीवनातून गायब आहेत. गत आठवड्यात जकार्ता येथे झालेल्या आसियान परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीतही किन गँग अनुपस्थित होते. तर नुकत्याच सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोवरुन ते चीनमधील फिनिक्स टीव्हीच्या सुप्रसिद्ध न्यूज अँकर आणि पत्रकार फू शियाओतियानसोबत पळून गेले असल्याचे बोलले जात आहे. त्या देखील मागील काही दिवसांपासून गायब आहेत. (The Communist Party has sacked Foreign Minister Qin Gang from his post)

दरम्यान, किन गँग यांच्या बेपत्ता होण्यामागे भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्याचीही चर्चा आहे. पण त्याच वेळी अँकर फू झियाओतियानशी जोडले जात आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षानेही किन गँग यांच्या पत्रकार मैत्रिणीशी असलेल्या जवळीकतेवर गंभीर चिंता व्यक्त केली होती. गेल्या दशकात चीनमध्ये घोटाळा, भ्रष्टाचार आणि करचोरी यासारखे गुन्हे चर्चेचा विषय ठरले आहेत. या सगळ्यात राजकारणी, अधिकारी, व्यापारी, अभिनेते वेळोवेळी बेपत्ता होत आहेत. जुलै 2018 मध्ये लोकप्रिय अभिनेता फॅन बिंगबिंग, ऑक्टोबर 2020 मध्ये अलिबाबा ग्रुपचे अब्जाधीश संस्थापक जॅक मा, जून 2021 मध्ये उपसुरक्षा मंत्री डोंग जिंगवेई, नोव्हेंबर 2021 मध्ये टेनिसपटू पेंग शुई अचानकरित्या गायब झाले होते आणि पुन्हा सार्वजनिक जीवनात दिसूनही आले होते.

भारताचे राजनैतिक आव्हान :

किन गँग यांना भारत-चीन सीमावाद सोडविण्यासाठी ओळखले जाणारे नेते म्हणून ओळखले जात होते. चीनचे नवे परराष्ट्र मंत्री होण्यापूर्वी त्यांनी एका जर्नलमध्ये लिहिले की सीमेवरील आजच्या स्थितीनुसार चीन आणि भारत दोघेही सीमावाद सोडविण्यास तयार आहेत आणि संयुक्तपणे त्यांच्या सीमेवर शांतता ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर यावर्षी मार्चमध्ये नवी दिल्ली येथे किन यांच्यासोबत झालेल्या भेटीत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली होती. सीमेवर परिस्थिती सामान्य होईपर्यंत संबंध सुधारणार नसल्याचे जयशंकर यांनी सांगितले होते.

China : चीनची अर्थव्यवस्था घसरली, पण कंडोमचा खप वाढला

त्यानुसार किन गँग आणि एस. जयशंकर दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र आता किन बेपत्ता झाल्याने आणि बरखास्त झाल्याने सीमावादावरून भारतासमोर पुन्हा अनेक आव्हाने उभी राहिली आहेत.

दोन्ही देशांमधील सीमेवरील तणाव हा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित वाद आहे. परंतु दोन्ही देशांनी सीमा विवाद परस्पर संमतीने सोडविण्याच्या प्रयत्नांमध्ये राजकीय संबंध कायम ठेवत व्यापार आणि गुंतवणूक दीर्घकाळ चालू ठेवली आहे. रस्ते बांधणीपासून ते कलम ३७० आणि काराकोरम पर्वतावरील चीनचे नियंत्रण रद्द करण्यापर्यंत भारत आणि चीनमध्ये वाद आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाला चीनने विरोध केला होता.

कलम 370- पाकिस्तान अनेक देशांत 5 ऑगस्टपासून भारतविरोधी निदर्शने करणार

अक्साई चीनच्या 38,000 चौरस किलोमीटर व्यतिरिक्त, शक्सगाम व्हॅलीच्या 5,000 चौरस किलोमीटरहून अधिक क्षेत्रावर चीनचे नियंत्रण आहे. 1948 मध्ये पाकिस्तानने त्यावर कब्जा केला होता. नंतर 1963 मध्ये एका करारानुसार पाकिस्तानने हा भाग चीनला दिला. चीन सरकारही भारताचाच भाग असलेल्या अरुणाचल प्रदेशावर दावा करत आहे. चीनने नुकतेच अरुणाचल प्रदेशातील 15 ठिकाणांचे नाव बदलले आहे. यातून एक प्रकारे चीनला अरुणाचल प्रदेश बेकायदेशीरपणे आपल्या ताब्यात घ्यायचा आहे.

Tags

follow us