मुंबई : कर्ज फसवणुक प्रकरणात आयसीआयसीआयच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआयने अटक केली आहे.
चंदा कोचर यांच्यावर मार्च 2018 मध्ये पतीला अर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी आपल्या पदाचा दुरूपयोग केल्याचे आरोप करण्यात आले होते.
आयसीआयसीआयकडून व्हिडीओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्सला 300 कोटी आणि व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेडला 750 कोटी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
हा निर्णयामुळे बॅंकेच्या रेगुलेशन आणि पॉलिसीचे उल्लंघन झाले. तर आयसीआयसीआयने व्हिडीओकॉनला हे कर्ज 2009 आणि 2011 ला दिले होते. ज्या कमिटीने हे कर्ज मंजूर केले त्या कमिटीमध्ये चंदा कोचर होत्या. तेव्हा त्या बॅंकेच्या एमडी आणि सीईओ होत्या. त्यानंतर मे 2020 मध्ये सक्तवसुली संचलनालयाने या प्रकरणी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांची चौकशी केली होती.
बॅंकेने सुरूवातीला कोचर यांना या प्रकरणी वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र लोकांच्या आणि नियामक मंडळाच्या दबावामुळे या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. आयसीआयसीआय बॅंकेने 30 मे 2018 ला स्वतंत्र घोषणा बोर्ड व्हिसल ब्लोअरच्या आरोपांचा ‘विस्तृत तपास’ करेल. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश बीएन श्रीकृष्णा यांना देण्यात आली.
जानेवारी 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाची तपास पूर्ण झाला आणि चंदा कोचर यांना दोषी ठरवण्यात आलं. 2020 च्या सुरुवातीस, ईडीने चंदा कोचर, दीपक कोचर आणि त्यांच्या मालकीच्या आणि नियंत्रित कंपन्यांची 78 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. त्यानंतर आता कर्ज फसवणुक प्रकरणात आयसीआयसीआयच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआयने अटक केली आहे.