आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदींना कोरोनाची बाधा, प्रकृती बिघडल्याने ऑक्सिजन सपोर्ट

मुंबई : आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. लंडनमधील एका रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. स्वत: ललित मोदी यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन फोटो शेअर करत माहिती दिली आहे. तसंच त्यांना पुढील उपचारासाठी लंडनला एअरलिफ्ट करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं असून त्याचेही फोटो पोस्ट […]

Untitled Design (2)

Untitled Design (2)

मुंबई : आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. लंडनमधील एका रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे.

स्वत: ललित मोदी यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन फोटो शेअर करत माहिती दिली आहे. तसंच त्यांना पुढील उपचारासाठी लंडनला एअरलिफ्ट करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं असून त्याचेही फोटो पोस्ट केले आहेत.

ललित यांनी आपले रुग्णालयातील फोटो पोस्ट करत सोबतच कॅप्शनमध्ये त्यांना होत असलेल्या त्रासासह सध्याच्या स्थितीचे अपडेटही दिले आहेत.

त्यांनी लिहिलं आहे की, ‘इन्फ्लूएंझा आणि न्यूमोनियासह 2 आठवड्यात दोनदा कोरोनाची बाधा झाली आहे. ज्यामुळे 3 आठवडे रुग्णालयाच राहिल्यानंतर अखेर डॉक्टरांच्या मदतीने माझ्या मुलाने मला लंडनमध्ये एअरलिफ्ट केले आहे.

एअर अॅम्ब्युलन्सने मी लंडनमध्ये उतरलो आहे. उड्डाण सुरळीत होते. पण मी अजूनही 24 तास ऑक्सिजन सपोर्टवरच आहे. माझी काळजी घेणाऱ्या सर्वांचे आभार. मी सर्वांचा अत्यंत ऋणी आहे. सर्वांना माझं प्रेम.

एअरलिफ्ट करत एअर अॅम्ब्युलन्सने ललित मोदी लंडनमध्ये

Exit mobile version