इंटरनेटवरून इमरान खान यांचे फोटो हटवले, मुलगा कासिमचा मोठा दावा, नक्की काय घडतय?

आम्हाला भीती वाटत आहे, आमच्यापासून काही गोष्टी लपवल्या जात आहेत, असा आम्हाला संशय असल्याचं त्याने म्हटलं आहे.

News Photo   2025 12 01T184035.914

News Photo 2025 12 01T184035.914

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांच्या संदर्भात उलट सुटल बातम्या समोर येत आहेत. यामुळे इमरान खान यांच्या कुटुंबामध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान आता पाकिस्तान सरकारने मोठा निर्णय घेतला आहे, इमरान खान यांचं नाव आणि फोटो दाखवण्यास प्रसारमाध्यमांवर बंदी घालण्यात आली आहे, तसेच इंटनेटवरून देखील इमरान खान यांचे फोटो हटवण्याचं काम सध्या सुरू आहे.

आम्हाला भीती वाटत आहे, आमच्यापासून काही गोष्टी लपवल्या जात आहेत, असा आम्हाला संशय असल्याचं त्याने म्हटलं आहे. इमरान खान यांचा मुलगा कासिम खान हे सध्या लंडनमध्ये राहत आहेत. मी माझ्या वडिलांना शेवटचं 2022 मध्ये पाहिलं होतं असं प्रतिक्रिया देताना इमरान खान यांच्या मुलानं म्हटलं आहे. तसंच, आम्ही इमरान खान यांच्याविरोधात सुरू असलेल्या पाकिस्तानी सरकारच्या कारवाईविरोधात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेकडे देखील दाद मागितली आहे असंही ते म्हणाले.

सस्पेन्स कायम! इम्रान खान यांचं नक्की काय झालं?, पाकिस्तानमध्ये तणाव वाढला

मानवाधिकारी संघटनेने देखील असं आदेश दिले आहेत की कोर्टाच्या निर्णयानुसार इमरान खान यांना तातडीनं त्यांच्या कुटुंबाला भेटण्याची परवानगी द्यावी, तसंच, इमरान खान यांना उत्तम आरोग्य सुविधा पुरवण्यात याव्यात आणि त्यांच्या आरोग्याची माहिती ही त्यांच्या कुटुंबाला नियमितपणे देण्यात यावी असंही म्हटलं आहे. यातील सध्या काहीही घडताना दिसून येत नाहीये, असा आरोप इमरान खान यांच्या मुलानं केला आहे.

इमरान खान यांचा मुलगा कासिम खान यांनी एका वृत्तसंस्थेला बोलताना एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे, गेल्या तीन आठवड्यापासून आम्हाला असा एकही पुरावा मिळालेला नाही, ज्यामधून आम्हाला अशी खात्री पटेल की माझे वडील जिवंत आहेत. मुलाला त्यांचे वडील जिवंत आहेत की नाही, ते सुरक्षित आहेत का? ते सध्या कोणत्या स्थितीमध्ये आहेत, हे जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, मात्र जर माहिती मिळत नसेल तर हा एक प्रकारचा मानसिक छळ असल्याचं इमरान खान याच्या मुलानं म्हटलं आहे.

Exit mobile version