Download App

इम्रान खानवर कोठडीत अत्याचार, ‘शौचालयही वापरु दिले नाही’

Former Prime Minister Imran Khan arrested : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना आठ दिवसांसाठी एन्टी करप्शन एजन्सीच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे. एनएबीने इस्लामाबाद येथील एका न्यायालयाला इम्रान खान यांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी 10 दिवसांची कोठडी मागितली होती. आता पुढील सुनावणी 17 मे रोजी होणार आहे.

काल इस्लामाबादमध्ये नियमित सुनावणीदरम्यान इम्रान खानला अटक करण्यात आली होती. पोलीस मुख्यालयातील विशेष न्यायालयात बंद दरवाजाआड हजर करण्यापूर्वी त्यांना रात्रभर अज्ञात स्थळी नेण्यात आले होते. इम्रान खान यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी कोठडीत छळ झाल्याचा आरोप केला आहे. त्यांना शौचालय वापरण्याची देखील परवानगी देण्यात आली नव्हती. तसेच हृदयाचे हालचाल कमी व्हावी यासाठी इंजेक्शन देण्यात आले होते, असा आरोप इम्रान खान यांनी केला आहे.

इम्रान खानच्या अटकेनंतर पाकिस्तानात तणाव, आत्तापर्यंत 900 जणांना अटक…

इम्रान खान यांच्या समर्थकांनी संपूर्ण पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने केली आहेत. या आंदोलनामुळे मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इम्रान खान म्हणाले की त्यांना सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी सरकारी आणि लष्करी अधिकारी प्रयत्न करत आहेत.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरुन पदच्युत करण्यात आले होते. त्यांना पदच्युत करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने अभूतपूर्व मोहीम राबवली होती. इम्रान खान यांची अटक देखील लष्करावर त्यांनी केलेल्या आरोपाच्या काही तासांनंतर झाली आहे. त्यांनी एक वरिष्ठ अधिकारी त्यांना मारण्याच्या कटात सामील होता, असा आरोप केला होता. 1947 पासून पाकिस्तानच्या राजकारण्यांना अनेकदा अटक आणि तुरुंगात टाकण्यात आले आहे, परंतु आतापर्यंत कोणीही थेट लष्कराला आव्हान दिले नव्हते.

CSK vs DC : चेन्नईचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने मोबाईल इंटरनेट सेवा बंद केली आहे तसेच ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूब सारख्या सोशल मीडिया साइट्सवर प्रतिबंधित करण्याचे आदेश दिले आहेत. देशभरातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.

Tags

follow us