इम्रान खानच्या अटकेनंतर पाकिस्तानात तणाव, आत्तापर्यंत 900 जणांना अटक…

इम्रान खानच्या अटकेनंतर पाकिस्तानात तणाव, आत्तापर्यंत 900 जणांना अटक…

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात मोठा हिंसाचार घडला आहे. हा हिंसाचार एवढा वाढला की, पाकिस्तानात गृहयुद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीय. तहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा हिंसाचार घडवून आणला आहे.

Sanjay Raut : उद्या लोकशाही, न्यायव्यवस्था अन् संविधान जिंकेल

हिंसाचाराच्या घटनेनंतर मंत्रालयाच्या आदेशानंतर पाकमधील पंजाब प्रांतात लष्कराच्या जवानांना तैनात करण्यात आलं आहे. दरम्यान, या हिंसाचारात मोठी हानी झाली असल्याचंही समोर आलं आहे. पाकच्या पंजाब प्रांतात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आलंय.

Pakistan : इम्रान खानच्या अटकेनंतर झालेल्या हिंसाचारात 8 जणांचा मृत्यू

लष्कराचे जवान जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनूसार तैनात आहे. आत्तापर्यंत पोलिसांकडून हिंसाचाराप्रकरणी 945 जणांना अटक करण्यात आली आहे. हिंसाचार करणाऱ्यांनी सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. तसेच या हिंसाचारात 25 पेक्षा अधिक गाड्या जाळण्यात आल्या असून 130 पेक्षा अधिक कर्मचारी जखमी झाले आहेत.

Shinde VS Thackery : सत्ता संघर्षाचा निकाल शिंदेंच्या विरोधात येणार? मुख्यमंत्री पदाची स्पर्धा तीव्र

इम्रान खान यांना इस्लामाबाद न्यायालयात परिसरातून अटक केल्यानंतर पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला. हिंसाचारामध्ये लोकांनी जवळपास 14 पेक्षा अधिक इमारती जाळण्यात आल्या आहेत. इम्रान खान यांच्यावर अल कदिर ट्रस्ट प्रकरणी भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी इम्रान खान इस्लामाबाद न्यायालयात सुनावणीसाठी आले होते.

कांताबाई अंधारे कसदार जमीन अन् मी दमदार पीक, सुषमा अंधारेंना अश्रू अनावर

इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचारासह इतर अनेक गुन्हा दाखल आहेत. न्यायालयात आले असता याचवेळी इम्रान यांना अटक करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. याबाबत पाकिस्तानच्या डॉन न्यूजने वृत्त दिले आहे.

इम्रान यांच्या अटकेनंतर लाहोर कॅंटमधील लष्करी कमांडरच्या घरांना आग लावण्यात आली होती. आंदोलकांनी मियांवली एअरबेसबाहेरील जहाजाची ढाचा जाळला असून इम्रान खान यांच्या अटकेनंतर समर्थकांनी पाकिस्तानी लष्करावर थेट निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ आहे. रेडिओ पाकिस्तानच्या इमारतीलाही आग लावण्यात आली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube