Sanjay Raut : उद्या लोकशाही, न्यायव्यवस्था अन् संविधान जिंकेल

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 10T171842.451

Sanjay Raut On Supreme Court Decision : सत्ता संघर्षावरही उद्या निकाल लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. उद्याच्या निकालात सर्वोच्च न्यायालय 16 आमदारांना अपत्रा ठरवार की त्यांच्या बाजून निकाल देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सत्ता संघर्षाच्या या सर्व सुनावणीदरम्यान 16 आमदारांचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा मनाला जात आहे.

या सर्व घडामोडींमध्ये आता देशाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. चंद्रचूड यांनी  एका सुनावणी दरम्यान ही टिपण्णी केली आहे. घटनापीठाकडून उद्या दोन महत्वाच्या निकालाचे संकेत मुख्य न्यायमूर्ती  चंद्रचूड यांनी दिले आहेत. यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अध्यक्षांचा निर्णय चुकला तरच कोर्ट हस्तक्षेप करतं; SC च्या निर्णयाआधी नार्वेकरांचं पुन्हा महत्त्वाचं विधान

या देशाच्या भाविष्याचा उद्या निकाल आहे. न्यायव्यवस्था ही स्वतंत्र आहे का? याचाही फैसला उद्या आहे. आम्ही असं म्हणत नाही की निकाल आमच्या बाजूने लागेल पण उद्या संविधानाचा आणि कायद्याचा विजय होईल, असे वक्तव्य ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केले आहे.  उद्या आम्हाला न्याय मिळेल . जर या देशात कायदा आणि संविधान उरलं असेल, न्यायव्यवस्थेवर कोणाचा दबाब नसेल तर उद्या न्याय होईल. मी निकालाची नव्हे तर न्यायाची गोष्ट करतोय, असेही राऊत म्हणाले आहेत.

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : शिंदे पहिल्या क्रमांकावर तर तानाजी सावंत दुसऱ्या स्थानी! ही आहे त्या १६ आमदारांची यादी…

आमदार अपात्र ठरतील, सरकार येईल, सरकार जाईल राजकारणात या गोष्टी घडत असतात. पण या देशाच्या भविष्याचा फैसला उद्या होईल. पाकिस्तानात तुम्हाला आज संविधान जळताना दिसतंय कारण पाकिस्तानसारखं राष्ट्र आपलं दुश्मन राष्ट्र असलं तरीही ते जळतंय. कारण ते संविधानानुसार चाललं नाही. विरोधकांवर सुडबुद्धीने कारवाया होत आहेत. सरकार पाडली जातायत, सरकारं आणली जातायत. न्यायव्यवस्था विकली गेली, हे चित्र या देशात असू नये. यासाठी उद्याचा फैसला सर्वोच्च न्यायालयाचा अत्यंत महत्त्वाचा आहे. न्यायालयाच्याबाबतीत कोणी सांगत असेल की आम्हीच जिंकणार तर त्यांनी काहीतरी गडबड केली आहे. पण मला अजूनही खात्री आहे की सर्वोच्च न्यायालय स्वतंत्र आहे असे म्हणत त्यांनी शिंदे गट आणि फडणवीसांना टोला लगावला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube