CSK vs DC : चेन्नईचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

CSK vs DC : चेन्नई आणि दिल्ली यांच्यातील सामना रोमांचक होऊ शकतो. दिल्ली गुणतालिकेत तळाशी आहे. मात्र गेल्या दोन सामन्यांत त्याने सलग विजयांची नोंद केली आहे. तर चेन्नई दुसऱ्या क्रमांकावर आहे. ते खूप मजबूत स्थितीत आहेत धोनी आणि वॉर्नरच्या संघात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ प्रथम गोलंदाजीसाठी मैदानात उतरेल.
आशिया कपमधून पाकिस्तान आऊट?; भारताचं पारडं जड
चेन्नई सुपर किंग्जची प्लेइंग इलेव्हन
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन – ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, मोईन अली, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (c/wk), दीपक चहर, मथिशा पाथीराना, तुषार देशपांडे, महिष टेकशाना
दिल्ली कॅपिटल्सची प्लेइंग इलेव्हन
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन: डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), मिचेल मार्श, रिले रुसो, अक्षर पटेल, अमन हकीम खान, ललित यादव, कुलदीप यादव, मुकेश कुमार, खलील अहमद, इशांत शर्मा