Download App

France : भारतीय प्रवाशांचे विमान फ्रान्सने रोखले, प्रवाशांची कसून चौकशी; धक्कादायक कारण समोर

France News : फ्रान्समधून मोठी बातमी समोर आली आहे. जवळपास तीनशे भारतीय प्रवासी प्रवास करत असलेले एक विमान फ्रान्सने (France News) अचानक रोखले. या अचानक झालेल्या प्रकाराने विमानातील प्रवाशांत मोठा गोंधळ उडाला. संयुक्त अरब अमिरातीतून (UAE) निकारागुआ येथे जात असलेल्या या विमानाला फ्रान्समध्ये रोखण्यात आले. यानंतर या विमानातील प्रवाशांची कसून चौकशी करण्यात आली. मानवी तस्करीच्या संशयामुळे (Human Trafficking) हे विमान रोखण्यात आले होते अशी माहिती फ्रेंच प्रसारमाध्यमांनी दिली आहे.

France Violence : वाहतूक नियम मोडला तर थेट गोळीच; जाणून घ्या, फ्रान्समध्ये असं का घडतंय?

मानवी तस्करीचा संशय फ्रान्सच्या एजन्सींना आहे. त्यामुळेच हे विमान रोखण्यात आले आहे. याबाबत अज्ञातांकडून माहिती मिळाल्यानंतर ही कार्यवाही करण्यात आली. विशेष म्हणजे, 26 जानेवारी या भारतीय प्रजासत्ताक दिनी भारत सरकारने फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्मानुएल मैक्रों यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे. मैक्रों यांनीही भारताचे हे आमंत्रण स्वीकारले आहे. मैक्रों यांनी स्वतः ट्विट करत याची माहिती दिली होती. या घडामोडी घडत असतानाच त्याच वेळी ही घटना समोर आली आहे.

स्थानिक मीडियानुसार, फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की निकारागुआकडे जात असलेल्या या विमानाचा वापर मानवी तस्करीसाठी केला जाऊ शकतो. हे विमान संयुक्त अरब अमिरात येथून निघाले होते. आता या विमानात जे प्रवासी आहेत त्यांचा प्रवास करण्याचे कारण काय, अटी आणि शर्ती काय आहेत याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. आता प्रवाशांची चौकशी सुरू करण्यात आली असली तरी या प्रवाशांना आणखी किती दिवस येथे ठेवण्यात येणार आहे, त्यांना पुन्हा भारतात परत पाठवले जाणार का, या प्रश्नांची उत्तरे फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी अजूनही दिलेली नाहीत.

फ्रान्समध्ये आणीबाणीची परिस्थिती! राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी बोलवली मंत्रिमंडळाची बैठक

निकारागुआ हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. या देशाच्या उत्तरेस होंडुरास, पू्र्वेकडे कॅरेबियन बेटे, दक्षिणेकडे कोस्टा रिका आणि पश्चिम दिशेला प्रशांत महासागर आहे. अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश करणाऱ्यांसाठी हा देश प्रवेशद्वारच आहे. या देशामार्गेच दररोज हजारो प्रवासी बेकायदेशीरपणे अमेरिका-मॅक्सिकोपर्यंत पोहोचतात. या मार्गात प्रवाशांना अनेक अडचणींनाही तोंड द्यावे लागते. चोरी लूटमार होण्याची सर्वाधिक शक्यता असते. निकारागुआत आल्यानंतर प्रवाशांची कोणतीही चौकशी किंवा तपासणी केली जात नाही.

Tags

follow us

वेब स्टोरीज