फ्रान्समध्ये आणीबाणीची परिस्थिती! राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी बोलवली मंत्रिमंडळाची बैठक
France Violence: फ्रान्समध्ये सलग तिसऱ्या दिवशीही हिंसाचार सुरूच आहे. पोलिसांच्या गोळीबारात 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानंतर हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटनांमध्ये आतापर्यंत दोन हजार वाहने जाळण्यात आली आहेत. तर 492 घरांचे नुकसान झाले आहे. फ्रेंच पोलिसांनी आतापर्यंत देशभरातील विविध भागातून 875 जणांना अटक केल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक घेतली आहे. फ्रान्सचे पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न म्हणाले की आपत्कालीन मंत्रिमंडळ बैठकीचा उद्देश सुव्यवस्था पुर्नस्थापित करण्यासाठी सर्व पर्यायांचा आढावा घेणे हा आहे. त्यात फ्रान्समधील आणीबाणीच्या परिस्थितीवरील चर्चेचा समावेश असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
फ्रान्समध्ये हिंसाचार का सुरु आहे?
27 जून रोजी, फ्रेंच पोलिसांनी नहेल एम नावाच्या 17 वर्षीय मुलाला सकाळी 9 वाजता ट्रॅफिक चेकिंग दरम्यान कार चालवत असताना गोळ्या घातल्या. फ्रान्सची राजधानी पॅरिसच्या उपनगरातील नॅनटेरे येथे हा अपघात झाला. पोलिसांनी प्रथम दावा केला की कारच्या टायरवर गोळीबार करताना ड्रायव्हरला गोळी लागली होती, परंतु नंतर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलिस कारच्या दारातून गोळीबार करत असल्याचे दिसून आले. या घटनेनंतर प्रथम पॅरिसमध्ये हिंसक निदर्शने सुरू झाली. त्यानंतर संपूर्ण फ्रान्सला वेढले.
‘… याचा दोषही समान नागरी कायद्याला देणार?’, ओवेसींचा मोदी सरकार आणि काँग्रेसवर हल्लाबोल
कोण होता नाहेल एम
नाहेल एम हा अल्जेरियन वंशाचा फ्रेंच निर्वासित होता. तो टेकवे डिलिव्हरी ड्रायव्हर म्हणून काम करत होता आणि रग्बी लीग खेळत होता. तो त्याच्या आईसोबत राहत होता. नहेलच्या वडिलांची माहिती नाही. सध्या नाहेलने इलेक्ट्रिशियन बनण्याचे प्रशिक्षण घेत होता. त्यासाठी सुरेसनेस येथील महाविद्यालयात त्याने प्रवेश घेतला होता. त्याचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नव्हता.
How can this be possible in France 🇫🇷 ?
😢#FRANCE #Nael #FranceProtests #franceViolence #FranceRiots #war #fusillade pic.twitter.com/8SKg4cIi2B— Santosh Gupta (@santoshskm) June 30, 2023
फ्रान्समध्ये सध्याची परिस्थिती काय आहे?
फ्रान्समधील अनेक शहरांमध्ये अजूनही हिंसाचार सुरूच आहे. त्यात राजधानी पॅरिसचाही समावेश आहे. फ्रान्समध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटनांमध्ये आतापर्यंत दोन हजार वाहने जाळण्यात आली आहेत. या दरम्यान 492 घरांचे नुकसान झाले आहे. एएफपीच्या म्हणण्यानुसार, एकट्या फ्रान्समध्ये काल रात्री जाळपोळीच्या 3800 घटना नोंदवण्यात आल्या. यासह आतापर्यंत 875 जणांना अटक करण्यात आली आहे.