पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या संबंधांवर गौतम अदानी म्हणाले…

नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानींवर पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जवळीक असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून करण्यात येतो. या आरोपांना गौतम अदानींनी एका टीव्ही मुलाखतीत उत्तरे दिली. काँग्रेसच्या राजीव गांधी सरकारच्या काळात आमचा व्यवसाय वाढू लागला होता आणि आज तो २२ राज्यांमध्ये पसरला आहे, त्या सर्व राज्यांमध्ये काही भाजपाची सत्ता नाही, गौतम अदानी […]

Untitled Design

Untitled Design

नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानींवर पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जवळीक असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून करण्यात येतो. या आरोपांना गौतम अदानींनी एका टीव्ही मुलाखतीत उत्तरे दिली.

काँग्रेसच्या राजीव गांधी सरकारच्या काळात आमचा व्यवसाय वाढू लागला होता आणि आज तो २२ राज्यांमध्ये पसरला आहे, त्या सर्व राज्यांमध्ये काही भाजपाची सत्ता नाही, गौतम अदानी म्हणाले.

गौतम अदानी म्हणाले, राजस्थान, केरळ, पश्चिम बंगाल, उडीसा, आंद्र प्रदेश, तेलंगना अशा वेगवेगळ्या 22 राज्यात अदानी ग्रुप काम करीत आहे. प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या विचाराचे सरकार आहे पण आमच्या ग्रुपला काम करीत असताना कोणत्याही अडचणी आल्या नाहीत. राहुल गांधींची विधाने राजकीय अर्थाने आहेत, असे अदानी म्हणाले.

भाजपचं सरकार असलेल्या राज्यात अदानी ग्रुपला जास्त प्रोजेक्ट मिळतात, असा आरोप केला जातो. यावर अदानी म्हणाले, हे सर्व आरोप राजकीय आहेत. ज्यांना मोदींची आणि त्यांच्या विचारांची अॅलर्जी आहे तेच लोक असे आरोप करीत आहेत. पण जास्तीत जास्त लोकांची मोदींना पसंती आहे. त्यांना अदानींच्या कामावर कोणताही आक्षेप नाही, असे गौतम अदानी म्हणाले.

अदानी म्हणाले, “व्यवसाय आणि व्यावहारिक जीवनात एकच सूत्र काम करतं. ते म्हणजे मेहनत आणि फक्त मेहनत. कौटुंबिक पाठबळ आणि देवाची कृपाही तुम्हाला खूप मदत करते. गुंतवणूक करणं हे आमचं काम आहे.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निमंत्रणावरून आम्ही राजस्थानच्या इन्व्हेस्टर समिटलाही गेलो होतो. यानंतर राहुल गांधीजींनीही राजस्थानमधील आमच्या गुंतवणुकीचे कौतुक केलं होतं,”

Exit mobile version