Google CEO Sundar Pichai’s speech Students walked out at Stanford Free Palestine slogans : गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुंदर पिचाई (Sundar Pichai) हे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना संबोधित करण्यासाठी व्यासपीठावर पोहोचताच कार्यक्रमात अचानक आंदोलनाला सुरुवात झाली. पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषणादरम्यान वॉकआउट केले. काही विद्यार्थी पॅलेस्टिनी ध्वज आणि फलक हातात घेऊन सभागृहाबाहेर पडले, तर काहींनी “फ्री पॅलेस्टाईन”च्या घोषणा दिल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
वाळू माफियांविरुद्ध आमदार विजयसिंह पंडीत मैदानात; पुराव्यांसह तहसिलदारांचीही केली भांडाफोट
स्टॅनफोर्ड विद्यापीठाने सुंदर पिचाई यांना 2026 च्या बॅचच्या पदवीदान समारंभासाठी प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित केले होते. विशेष म्हणजे, सुंदर पिचाई यांनी याच विद्यापीठातून मटेरियल्स सायन्स अँड इंजिनिअरिंग विषयात मास्टर ऑफ सायन्स (MS) पदवी प्राप्त केली होती. अनेक वर्षांनंतर ते पुन्हा आपल्या विद्यापीठात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते.विद्यापीठाच्या अहवालानुसार, 135 व्या पदवीदान समारंभात 20 हजारांहून अधिक लोक उपस्थित होते. त्यामध्ये सुमारे 3,600 विद्यार्थ्यांचा समावेश होता.
भाषण सुरू होताच सुमारे 200 विद्यार्थ्यांचा वॉकआउट
SFGate च्या वृत्तानुसार, सुंदर पिचाई यांच्या भाषणादरम्यान सुमारे 200 विद्यार्थ्यांनी कार्यक्रम सोडून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. प्रेक्षकांमधील काही गटांनी फलक दाखवत, शिट्ट्या वाजवत आणि पॅलेस्टिनी ध्वज फडकावत निषेध नोंदवला. त्यानंतर त्यांनी भाषण अर्धवट सोडून कार्यक्रमातून बाहेर पडले.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्येही विद्यार्थी पॅलेस्टिनी ध्वज आणि पोस्टर्स घेऊन सभागृहाबाहेर जाताना दिसत आहेत. काही विद्यार्थी “फ्री पॅलेस्टाईन”च्या घोषणा देतानाही दिसून आले.
आंदोलनामागे कोण?
वृत्तानुसार, या आंदोलनाचे आयोजन “Students for Justice in Palestine” आणि “No Tech for Apartheid” या संघटनांनी केले होते. या संघटनांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आणि इस्रायलविरोधात आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी हा निषेध आयोजित केला होता.
गुगल-इस्रायल करारावरून विरोध
SFGate च्या माहितीनुसार, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मुख्य आक्षेप गुगल आणि इस्रायल सरकारमधील संबंधांवर होता. विशेषतः विद्यार्थ्यांनी “प्रोजेक्ट निम्बस” (Project Nimbus) या कराराला विरोध दर्शवला.2021 मध्ये गुगल आणि इस्रायल सरकार यांच्यात सुमारे 1.2 अब्ज डॉलर्सचा क्लाउड कॉम्प्युटिंग करार झाला होता. विद्यार्थ्यांच्या मते, या करारामुळे इस्रायल सरकारला तांत्रिक मदत मिळत असून त्यामुळे मानवी हक्कांबाबत चिंता निर्माण होत आहे.
Stanford grads walk out as Google CEO Sundar Pichai takes the stage as commencement speaker. No mention of AI, unlike other uni speakers getting booed down this year. Story for @sfgate shortly pic.twitter.com/qvS2rJ91Ip
— Matt Brown (@maattttbrown) June 14, 2026
दरम्यान, गेल्या तीन वर्षांपासून स्टॅनफोर्ड विद्यापीठातील पदवीदान समारंभांदरम्यान इस्रायल-गाझा संघर्ष आणि पॅलेस्टाईन समर्थक आंदोलनांवर विद्यापीठ प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात विविध प्रकारचे निषेध होत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
