मुंबई : आज देशभरात 74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा केला जातोय. देशभरात उत्साह पाहायला मिळतोय. आज देशातील विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त गूगलनं खास डूडल तयार (Google Doodle) केलंय. सर्च इंजिन गूगलनं हे डूडल तयार करुन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या खास गूगल डूडलबाबत अधिक जाणून घेऊया…
या खास डूडलमध्ये एक हातानं डिझाइन केलेलं पेपरकटींग आर्टवर्क (Paper Cutting Artwork)पाहायला मिळतंय. हे आर्ट वर्क गुजरातच्या गेस्ट आर्टिस्टनं तयार केलंय. हे पेपरकटींग आर्ट तयार करणाऱ्या कलाकाराचं नाव पार्थ कोथेकर असं आहे. पार्थने तयार केलेल्या या पेपरकट आर्टवर्कमध्ये इंडिया गेट, भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर, सीआरपीएफची मार्चिंग तुकडी यासह विविध गोष्टी पाहायला मिळताहेत. हे गूगल डूडल डिझाइन केल्यावर पार्थनं हे सांगितलंय.
‘जेव्हा तुम्हाला या डूडलवर काम करण्यासाठी संधी तुला मिळाली तेव्हा तुझी रिअॅक्शन कशी होती?’ असा प्रश्न एका मुलाखतीमध्ये पार्थला विचारण्यात आला. त्यावेळी पार्थनं उत्तर दिलं, ‘माझ्या अंगावर शहारे आले. मी अनेक वेळा गूगलचा ईमेल वाचला कारण माझा त्यावर विश्वास बसत नव्हता. त्यानंतर मी माझ्या आई आणि बहिणीला याबद्दल माहिती दिली. मला अशी संधी मिळेल असे वाटले नव्हते.’
पार्थला विचारलं की, ‘लोक तुझ्या डूडलमधून कोणता संदेश घेतील?’ या प्रश्नाचं उत्तरात पार्थनं सांगितलं की, ‘हा पेपर कट पूर्ण होण्यासाठी मला चार दिवस लागले. एका दिवसात मी सहा तास काम केलं. मला भारतातील कॉम्पेक्सिटी, त्यांचे परस्परांशी जोडलेले पैलू दाखवायचे होते, याची झलक कलाकृतीच्या कॉम्पेक्सिटीमधून (complexity) दर्शकांना पाहायला मिळेल, अशी मला आशा आहे, असंही पार्थ म्हणाला.