Download App

79 मृत्यू, 104 लोक गायब; ग्रीसच्या समुद्रात प्रवाशांनी खचाखच भरलेल्या जहाजाला जलसमाधी

Greece Ship Capsized :  युरोपातील ग्रीसच्या किनाऱ्याजवळ बुधवारी (१४ जून) रोजी एक जहाज बुडाल्याने 79 जणांचा मृत्यू झाला. मात्र, या अपघातात किमान 100 जणांचा मृत्यू झाल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना अलीकडच्या काळातील सर्वात धोकादायक बोट अपघातांपैकी एक मानली जाते.

बोट बुडाल्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. युरोपियन रेस्क्यू हेल्पिंग चॅरिटीच्या मते, जहाजावर सुमारे 750 लोक होते, तर यूएन स्थलांतरित एजन्सीने बोर्डवरील लोकांची संख्या 400 सांगितली आहे. मात्र, अपघातानंतर स्थानिक वेळेनुसार दुपारपर्यंत 104 जणांना वाचवण्यात यश आले आहे. रिपोर्टनुसार ही बोट लिबियाहून निघाली होती.

Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा

स्थानिक प्रशासनाच्या अहवालानुसार, जहाजावर उपस्थित असलेले बहुतेक प्रवासी इजिप्त, सीरिया आणि पाकिस्तानशी संबंधित होते. दक्षिण ग्रीसमधील पायलोस शहरापासून सुमारे 80 किमी अंतरावर स्थलांतरितांनी भरलेले हे जहाज बुडाले. जहाज बुडाल्यानंतर तटरक्षक दलाची सहा जहाजे, नौदलाचे एक जहाज, लष्कराचे एक वाहतूक विमान आणि लष्कराचे एक हेलिकॉप्टर यासह ड्रोनची मदत घेतली जात आहे.

Nitesh Rane on Sanjay Raut : …म्हणून मी पातळी सोडून बोलतो; राणेंनी सांगितली राऊतांविरोधातील युद्धनीती

रात्री अंधार पडल्याने बचावकार्य थांबवावे लागल्याचे बचाव पथकाने सांगितले. मात्र, अपघाताच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी ( 15 जून ) सकाळी पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात आले. वाचलेल्यांना पायलोस जवळील कालामाता या ग्रीक बंदरात नेण्यात आले, तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि त्यांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली. दरम्यान, या दुर्घटनेनंतर ग्रीक प्रशासनाने तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला.

Tags

follow us