Download App

जीएसटी कपातीचा परिणाम! ट्रम्प यांचा सूर बदलला; शेअर बाजाराची सुरुवात तेजीने

आज आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स निर्देशांक उघडताच 200 अंकांनी वाढला.

GST cut results into Trump’s tone changed Stock market started on high note : मोदी सरकारच्या जीएसटी दर कपातीच्या घोषणेचा परिणाम अजूनही शेअर बाजारावर दिसून येत आहे. आज आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स निर्देशांक उघडताच 200 अंकांनी वाढला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील मागील बंदशी तुलना करता वाढ होऊन ग्रीन झोनमध्ये उघडला.

Maratha reservation : अन्यथा, …मोठा निर्णय घ्यावा लागेल! मनोज जरांगे पाटलांचा थेट सरकारला अल्टीमेटम

सुरुवातीच्या व्यवहारात, टाटा स्टील, टाटा मोटर्ससह महिंद्रा अँड महिंद्रा, इन्फोसिस, बीईएल सारखे मोठे शेअर्स (Shares) वेगाने पुढे जात असल्याचे दिसून आले. जीएसटी कपातीच्या परिणामाबरोबरच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या भारताप्रती (Modi) बदललेल्या भूमिकेचा परिणामही बाजारावर स्पष्टपणे दिसून येत आहे.

भावी मुख्यमंत्री म्हणून मिरवून घेणारे आरक्षणावर गप्प का? मंत्री विखेंचा थोरातांवर थेट निशाणा

दोन्ही निर्देशांक ग्रीन झोनमध्ये उघडले

शेअर (Shares) बाजाराच्या मजबूत सुरुवातीदरम्यान, सेन्सेक्स 80.904.40 च्या पातळीवर उघडला, जो मागील बंद 80,710.76 पासून वाढला. आणि मग काही मिनिटांतच त्याने 81,000 चा स्तर ओलांडला. बीएसई निर्देशांकाप्रमाणे, निफ्टी देखील वर गेला आणि हा एनएसई निर्देशांक 24,741 च्या मागील बंद वरून 24,802.60 वर उघडल्यानंतर 24,831.35 वर पोहोचला.

पंजाबला महापूराचा तडाखा! 48 जणांचा बळी, 20 लाख लोक संकटात, 4 लाख बेघर

बाजार उघडताच हे 10 शेअर्स वधारले

जर बाजार उघडताच सर्वाधिक वाढ झालेल्या टॉप 10 शेअर्सबद्दल (Shares) बोलायचे झाले तर लार्ज कॅपमध्ये, टाटा स्टीलचे शेअर्स (2.50%), टाटा मोटर्सचे शेअर्स (2.35%), महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स (1.95%) आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्स (1.10%) वाढीसह व्यवहार करत होते. मिडकॅप श्रेणीमध्ये, फर्स्टक्रायचे शेअर्स (3.90%), मान्यवरचे शेअर्स (3%), भारतफोर्जचे शेअर्स (2.95%) आणि ऑलेक्ट्राचे शेअर्स (2.90%) वाढीसह व्यवहार करत होते. स्मॉलकॅप कंपन्यांमध्ये, प्राइम फोकस शेअर (10%) आणि मुफिन शेअर (8.10%) जास्त व्यवहार करत होते.

‘इथे फक्त आंदेकरच…!’ आयुषवर झाडल्या धडाधड 9 गोळ्या; वडिल पॅरोलवर बाहेर, आज अंत्यसंस्कार

जीएसटीबाबत ट्रम्पच्या बदललेल्या भूमिकेचा परिणाम

जीएसटी सुधारणांबाबत मोदी (Modi) सरकारने केलेल्या घोषणांचा परिणाम शेअर बाजारावर (Shares) आधीच दिसून येत होता. कर स्लॅबची संख्या कमी करण्यासोबतच, सरकारने अनेक वस्तूंवर जीएसटीमधून सवलत दिली आहे. त्यानंतर संबंधित कंपन्यांचे शेअर्स प्रचंड वाढले आहेत. त्याच वेळी, डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारताबाबतच्या (Modi) सॉफ्ट टोनचा परिणाम देखील दिसून येत आहे. रशियाच्या तेल खरेदीवरून भारत आणि अमेरिकेत अनेक महिन्यांपासून मतभेद सुरू आहेत. यानंतर, गेल्या शनिवारी अचानक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आपला प्रक्षोभक पवित्रा सोडून दिला. डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचे (Modi) मैत्रीचे कार्ड खेळले. आता डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या भारताप्रती असलेल्या सॉफ्ट टोनचा परिणाम दिसून येत आहे.

follow us