सहा इराणी शहरांवर हल्ल्यांचे वृत्त; आखाती देशांनी हवाई क्षेत्र बंद केले, अमेरिकन ठिकाणांवर हल्ल्यांचा दावा

विविध ठिकाणी हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय करण्यात आल्याचे दिसून आले. या घटनांमुळे आखाती प्रदेशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Untitled Design 124

Untitled Design 124

Gulf countries close airspace : आखाती देशांत अत्यंत तणावपूर्ण आणि वेगाने बदलणाऱ्या घडामोडी समोर येत आहेत. अनेक देशांमधून सलग स्फोटांचे वृत्त येत असून स्थानिक नागरिकांनी मोठ्या आवाजांचे धक्के जाणवल्याने सांगितले आहे. प्रादेशिक माध्यमांनुसार विविध ठिकाणी हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय करण्यात आल्याचे दिसून आले आहे. या घटनांमुळे सामुर्ण आखाती प्रदेशात भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

विदेशी माध्यमांच्या अहवालानुसार अबू धाबी आणि दुबई, बहरीन, सौदी अरेबिया, कुवेत आणि कतार या शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आल्याची माहिती समोर आली आहे. काही ठिकाणी आकाशात प्रकाशझोत आणि क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणांची हालचाल दिसल्याचे देखील सांगितले जात आहे.

या स्फोटांच्या पार्श्वभूमीवर इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ले केल्याचे दावे करण्यात येत आहेत. सकाळी अमेरिकन आणि इस्त्रायली दलांकडून तेहरानमध्ये कारवाई झाल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले करण्यात आल्याचा दावा इराणकडून केला जात आहे. युद्ध तुम्ही सुरू केले आहे. पण ते संपवणार आम्ही, असा इशारा देखील इराणकडून देण्यात आल्याची बातमी आहे.

दरम्यान इराणमधील परिस्थिती देखील गंभीर असल्याचे समोर येत आहे. इराणचे सर्वोच्च नेते आयातोल्ला खोमेनी यांच्या निवासस्थानावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच इराणच्या गुप्तचर यंत्रणेच्या मुख्यालयावर देखील हल्ला करण्यात आला आहे. इश्फहान, कोम, कराज आणि तबरिज यांच्यासह एकूण सहा शहरांवर एकाच वेळी हल्ले झाल्याचे सांगितले जात आहे.

मी अजितदादांच्या अपघाती निधनावर बोलतो त्याला माझ्या पक्षातील लोकांचा विरोध…, मिटकरींचा रोख कुणाकडं?

प्रादेशिक अपडेट्सनुसार अमेरिकेशी संबंधित महत्वाच्या लष्करी स्थळांना लक्ष करण्यात आल्याचा दावा आहे. यामध्ये बहरीनमधील अमेरिकन नौदलाच्या पाचव्या ताफ्याचे मुख्यालय, कतारमधील अल उदिद एअर बेस, संयुक्त अरब अमिरातीतील अल धाफरा एअर बेस तसेच कुवेतमधील अमेरिकन लष्करी कारवायांशी संबंधित इतर ठिकाणांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. मनामाच्या जुफैर परिसरात, जिथे अमेरिकन नौदलाची मोठी उपस्थिती आहे, तिथे धुराचे लोट दिसल्याचे वृत्त आहे.

परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता कतार, कुवैत आणि संयुक्त अरब अमिराती यांनी आपले हवाई क्षेत्र तात्पुरते बंद केल्याचे समजते. कतार प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा आणि लष्करी टाळ्यांच्या परिसरापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. कुवेतमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आल्यानंतर इशारा देण्यासाठी सायरन वाजवण्यात आल्याचीही माहिती समोर येत आहे. काही भागांत क्षेपणास्त्र अडवण्यात आल्याचे आणि हवाई संरक्षण प्रणालींनी संभाव्य धोक्यांना प्रत्युत्तर दिल्याचे देखील सांगितले जात आहे.

सध्या संपूर्ण परिस्थिती अत्यंत चंचल आहे आणि अधिकृत माहिती टप्प्य्टप्प्याने समोर येत आहे. विविध देशांकडू प्रतिक्रिया येत असून सुरक्षा यंत्रणा उच्च सतर्कतेवर ठेवण्यात आल्या आहेत. नुकसानीचे प्रमाण आणि संभाव्य जीवितहानीबाबत अद्याप अधिकृत आणि संपूर्ण माहिती उपलब्ध झालेली नाही. या घडामोडी वेगाने बदलत असून पुढील काही तास अत्यंत महत्वाचे ठरणार असल्याचे मानले जात आहे.

Exit mobile version