Download App

मोठी बातमी : इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त

इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रायची यांचे हॅलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्तले आहे. रविवारी ही घटना घडली आहे. सरकारच्या वृत्तवाहिनीने ही माहिती दिली आहे.

  • Written By: Last Updated:

Helicopter Carrying Iranian President Ebrahim Raisi Makes Hard Landing Near Azerbaijan Border: इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी (Ebrahim Raisi) यांचे हॅलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले आहे. रविवारी ही घटना घडली आहे. सरकारच्या वृत्तवाहिनीने ही माहिती दिली आहे. राष्ट्रपती हे अझरबैजान देशाच्या(Azerbaijan) दौऱ्यावर होते. एका डॅमच्या उद्घाटनासाठी ते जात असताना ही घटना घडली आहे.

मद्यधुंद अवस्थेत दोघांना चिरडले, मुलाचे वडिल आणि बार मालकाविरोधात गुन्हा

हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेची घटना इराणची राजधानी तेहरानपासून सहाशे किलोमीटर दूर उत्तर-पश्चिमच्या अझरबैजानच्या सीमेवरील जोल्फा येथे घडली आहे. हेलिकॉप्टर व्यवस्थित लॅंड झालेले नसल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. असे वृत्त काही वृत्तसंस्थांनी दिले आहे. मात्र याबाबत अद्याप सविस्तर माहितीसमोर आलेले नाही.

राष्ट्रपती रईसी हे अझरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम अलीयेव यांच्याबरोबर एका धरणाच्या उद्घाटनासाठी अझरबैजान येथे जात होते. दोन्ही देशांनी मिळून तिसरी धरण अरास नदीवर उभारले आहे. त्याच्याच उद्घाटनाला जात असताना हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालेले आहे. हॅलिकॉप्टर कोसळले असल्याचे वृत्त अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी दिले आहे. बचाव कार्यासाठी एक पथक प्रयत्न करत आहे.

मोठी बातमी ! महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी विधानसभेपूर्वी ?

या भागात हवामान परिस्थिती चांगली नाही. या भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे बचाव कार्यासाठी पथक जाण्यास अडचण निर्माण झाली आहे. ईएचए न्यूजने दिलेल्या माहितीनुसार पूर्व अझरबैजनाचे गव्हर्नर अयातुल्ला अल-हाशेम आणि इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीर-अब्दोल्लाहियन हे हेलिकॉप्टरमध्ये होते. असं सांगण्यात येत आहे.

कोण आहेत रईसी ?
63 वर्षीय रईसी हे कट्टरपंथी आहेत. राष्ट्रपती होण्यापूर्वी ते देशातील न्यायव्यवस्थेचा कारभार पाहत होते. इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनेई यांचे ते शिष्य आहेत. गेल्या वर्षी ते राष्ट्रपती झाले.

follow us