मद्यधुंद अवस्थेत दोघांना चिरडले, मुलाचे वडिल आणि बार मालकाविरोधात गुन्हा

मद्यधुंद अवस्थेत दोघांना चिरडले, मुलाचे वडिल आणि बार मालकाविरोधात गुन्हा

Pune Accident : पुण्याती प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगात आलिशान कार चालवत दोघांना धडक दिली. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी (Yerwada Police Station) अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत गुन्हा दाखल करून कोर्टात हजर केले असता कोर्टाने अल्पवयीन मुलाला जामीन दिला आहे. तर अल्पवयीन मुलाला कार दिल्याप्रकरणी त्याच्या वडिलांवर आणि बारमध्ये दारू पुरवल्याप्रकरणी बार मालकावरही  गुन्हा दाखल केला.

मोठी बातमी ! महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी विधानसभेपूर्वी 

पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर ब्रह्मा कॉर्पोरेशनचे विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा वेदांत याने अत्यंत बेदरकारपणे आलिशान कार चालवत रस्त्यावरील वाहनांना धडक दिली. यामध्ये दोघेजण चिरडले गेले. शनिवारी मध्यरात्री हा भीषण कल्याणनगर येथे अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवर असलेली तरुणी हवेत उडाली आणि त्यानंतर जमीनीवर आदळून तिचा जागीच मृत्यू झाला. अश्विनी कोस्टा असं मृत तरुणीचं नावं आहे. तर अपघातात जमखी झालेले अनीस अवलिया यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी आणि अनिस हे दोघेही त्यांच्या मोटारसायकलवरून कल्याणीनगरहून येरवड्याकडे जात आहे. त्यावेळी पोर्स ही आलिशान कार याच मार्गावर भरधाव वेगात निघाली होती. कारमधील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने मोटारसायकल व इतर वाहनांना धडक दिली. यामध्ये अनिस आणि अश्विनी यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, या अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, कार 200 किमी/तास वेगाने होती.

वेदांत अग्रवालला जामीन मंजूर….
दरम्यान, या प्रकरणी पुण्यातील येरवडा पोलिस ठाण्यात अल्पवयीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी वेदांत अग्रवाल याला ताब्यात घेऊन सुट्टीच्या कोर्टात हजर केले होते. एफआयआरमधील सर्व कलमे जामीनपात्र असल्याने काही अटींवर त्याला जामीन मंजूर करण्यात आला.

दरम्यान, पुण्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले की, अल्पवयीने आरोपीचे वडील आणि आरोपींना दारू देणाऱ्या बारवर बाल न्याय कायद्याच्या कलम 75 आणि 77 नुसार कारवाई केली जात आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज