Download App

भारतात ॲपलचे कारखाने उभारू नका; ट्रम्प तात्यांंनी पुन्हा फिरवलं ‘कार्ड’; टॉम कुक यांना दिला सल्ला

डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपल कंपनीचे सीईओ टीम कूक यांच्याशी चर्चा झाल्याचा दावा केला आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये याबाबतीत दावा करण्यात आला आहे.

Donald Trump : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) विशेष चर्चेत आहेत. आताही ट्रम्प यांच्या बाबतीत मोठी बातमी समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपल कंपनीचे सीईओ टीम कूक यांच्याशी चर्चा झाल्याचा दावा केला आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये याबाबतीत दावा करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, कतरची राजधानी दोहा येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात आयफोनचे प्रोडक्शन युनिट भारतात सुरू करू नका. मला टीम कूक (Tim Cook) यांच्या या प्लॅनपासून समस्या जाणवतात. मी त्यांना स्पष्ट सांगितलं आहे की भारतातच इतके जास्त प्लांट सुरू करण्याची काय गरज आहे?

ट्रम्प पुढे म्हणाले, टीम कूक संपूर्ण भारतात प्रोडक्शन युनिट सुरू करत आहेत. कंपनीने भारतात विस्तार करावा असे मला वाटत नाही. आता मी असं बोलल्यानंतर अॅपलकडून अमेरिकेत आयफोनचे उत्पादन वाढवले जाणार आहे अशी पुस्तीही त्यांनी जोडली. भारत जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. परंतु, या देशात अमेरिकी उत्पादनांची विक्री करणं खूप कठीण आहे. अमेरिकी वस्तूंवर टॅरिफ हटवणार असल्याचे भारताने म्हटले आहे. भारत आता अमेरिकेबरोबर ट्रेड डील करण्याच्या विचारात आहे. याबरोबरच आपल्या उत्पादनांवर अॅग्रीमेंट करण्यास इच्छुक आहे असेही ट्रम्प यांनी सांगितले.

Operation Sindoor : सौदीतच ठरला ‘इस बार बडा करेंगें’ चा प्लॅन; 45 सिक्रेट बैठका अन्…

डोनाल्ड ट्रम्प यांनी वक्तव्य अशा वेळी केले आहे जेव्हा अॅपलकडून चीन व्यतिरिक्त भारतात प्रोडक्शन युनिट सुरू केले जात आहेत. पुरवठा साखळीत फक्त चीनवरच अवलंबून राहू नये यासाठी कंपनीने ही रणनिती आखली आहे. यासाठी भारतात कारखाने सुरू केले जात आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी याच प्लॅनवर आक्षेप घेतला आहे. खरंतर आयफोनचे जास्तीत जास्त उत्पादन चीनमध्येच होते. अमेरिकेत कोणतेही उत्पादन होत नव्हते.

आता ट्रम्प यांना वाटत आहे की आयफोनचे कारखाने भारताऐवजी अमेरिकेत सुरू व्हावेत. कोरोना काळात ज्यावेळी लॉकडाउन होते त्यावेळी पुरवठा साखळी प्रभावित झाली होती. त्यामुळे अॅपलने विविध देशांत पुरवठा साखळी विस्तारण्याची योजना तयार केली होती. या अंतर्गत अनेक ठिकाणी आयफोनचे प्रोडक्शन युनिट सुरू करण्याची तयारी केली जात आहे. भारतात आयफोन जास्तीत जास्त प्रमाणात फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुपकडून तयार केले जात आहेत.

Balochistan : मोदींसाठी खास व्हिडिओ, भारत अन् बलुचिस्तानमध्ये क्रिकेटचा सामना; कुणाचा पुढाकार?

follow us