If talks don’t work out… Trump threatens Iran ahead of talks in Islamabad : अमेरिका इराणच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये आज 11 एप्रिल 2026 रोजी इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये युद्धबंदी तसेच एकमेकांच्या अटी शर्थींबाबत चर्चा होणार आहे. मात्र या चर्चा अगोदरच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी देणारं एक मोठं वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
पाकिस्तानमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यात होणाऱ्या चर्चेपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी देत म्हटला आहे की, पुढच्या 24 तासांत इराणबाबत चित्र स्पष्ट होईल. मात्र ही चर्चा यशस्वी झाली नाही तर अमेरिका इराणवर हल्ला करण्यास अमेरिका पूर्ण तयार आहे. त्यामुळे तेहरानकडे कोणताही पर्याय उरलेला नाही. ते फक्त महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावर नियंत्रण ठेवत जगावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल या प्लॅटफॉर्मवरून पोस्ट करून दिली आहे.
कोणत्या राशींना होणार फायदा अन् कसा असणार आजचा दिवस? जाणून घ्या सविस्तर…
दरम्यान अमेरिकेने दिलेल्या या धमकीनंतर इराणची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. पाकिस्तानात होणाऱ्या चर्चेपूर्वी इराणकडून अमेरिकेसमोर एक अट ठेवण्यात आली आहे. ही अट म्हणजे जोपर्यंत लेबनॉनमध्ये शस्त्रसंधी होत नाही. तोपर्यंत चर्चा सुरू करणार नाही. तसेच इराणच्या गोठवण्यात आलेल्या फंडाची रक्कम देखील परत देण्यात यावी. चर्चेच्या सुरुवातीला यावर चर्चा केली जावी. अशी अट इराणने अमेरिकेसमोर ठेवली आहे. त्यामुळे आता आजच्या या बैठकीमध्ये नेमकं काय होणार? यावर या युद्धाची पुढची रूपरेषा अवलंबून आहे.
