पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान यांच्या अडचणी कमी होत नाहीत. बुधवारपासून इम्रान खान यांच्या लाहोरमधील निवासस्थानाबाहेर पोलीस तळ ठोकून आहेत. पोलीस त्यांना केव्हाही अटक करू शकतात.
कथित दहशतवादी लपल्याचा आरोप
इम्रान खान यांच्या निवासस्थानी अनेक दहशतवादी लपले असल्याचा पोलिसांचा दावा आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पोलीस कधीही ऑपरेशन सुरू करू शकतात. स्थानिक पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले आहे की, जमान पार्ककडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले असून या भागात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सिद्धरामय्या मुख्यमंत्री : शिवकुमारांचं खच्चीकरण की काँग्रेसची राजकीय खेळी?
दहशतवाद्यांना 24 तासांचा अल्टिमेटम
इम्रान खानच्या घरी आश्रय घेतलेल्या कथित दहशतवाद्यांना ताब्यात देण्यासाठी पाकिस्तान मधील पंजाब सरकारने 24 तासांचा अल्टिमेटम दिला होता. आता अल्टिमेटम संपला. अल्टिमेटम संपल्यानंतर मोठी कारवाई होऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना
एजन्सीने म्हटले आहे की पंजाब पोलिसांचे महानिरीक्षक आणि राजधानीचे पोलिस अधिकारी यांनी पोलिसांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. पंजाबचे कार्यवाहक माहिती मंत्री आमिर मीर यांनी बुधवारी रात्री सांगितले की, पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान यांना अटक करण्याची प्रांतीय सरकारची सध्या कोणतीही योजना नाही. पाकिस्तान सरकारच्या एका मंत्री म्हणाले, “प्रथम 24 तासांची मुदत संपू द्या, मग सरकार आपल्या योजना उघड करेल.”