Download App

इम्रान खानला न्यायालयाचा मोठा धक्का! पक्षाची रॅली काढण्यास घातली बंदी

पाकिस्तान : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Former Prime Minister Imran Khan) यांना लाहोर उच्च न्यायालयाने (LAHORE HIGH COURT) मोठा धक्का दिला. उच्च न्यायालयाने त्यांचा पक्ष पाकिस्तान (Pakistan) तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) ला रविवारी लाहोरच्या मिनार भागात रॅली काढण्यापासून रोखले आहे.

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे प्रमुख इम्रान खान यांच्याशी संबंधित खटल्याची सुनावणी करताना लाहोर उच्च न्यायालयाने गुरुवारी सांगितले की, “पोलिस-प्रशासनाने इम्रान खानच्या अटकेसाठी जमान पार्कमध्ये सुरू केलेली मोहीम तूर्तास थांबवावी.” यानंतर हायकोर्टाने इम्रान खान यांना आदेश दिला की, “तुम्हाला सार्वजनिक सभा आयोजित करायची असेल तर १५ दिवस अगोदर नियोजन करा, जेणेकरून योग्य व्यवस्था करता येईल”.

इम्रानच्या अटकेला स्थगिती देताना लाहोर उच्च न्यायालयाने बुधवारी (१५ मार्च) सांगितले की, इस्लामाबाद उच्च न्यायालयाचा आदेश येईपर्यंत पोलिसांनी (Police) इम्रान खानच्या अटकेसाठी जमान पार्कमधील त्यांची कारवाई थांबवावी. मात्र, उच्च न्यायालयाची ही बंदी कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या संस्थांना लागू होणार नाही, त्यामुळे यंत्रणांच्या वतीने इम्रानच्या निवासस्थानाची नाकेबंदी सुरूच राहणार आहे.

इम्रान खान म्हणाले होते, लोकांनी साथ द्यावी, मला मारले जाऊ शकते. इम्रानच्या अटकेवरून लाहोरमध्ये अनेक दिवसांपासून गोंधळ सुरू आहे. इम्रान खानवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यासाठी पाकिस्तानी पोलीस त्यांच्या लाहोर येथील निवासस्थानी पोहोचले. जड पोलीस जबता आणि रेंजर्सचे पथक शर्थीचे प्रयत्न करूनही इम्रानला पकडू शकले नाही, याचे कारण इम्रान खानचे समर्थक पोलीस जबतासमोर भिंतीसारखे उभे होते. यादरम्यान पोलिस आणि इम्रान समर्थकांमध्ये तासनतास झटापट झाली. अनेक पोलीस जखमी झाले आणि अनेक इम्रान समर्थकांचा वाद झाले आहेत.

अमेरिकेचा चीनला मोठा धक्का; अरुणाचल प्रदेश भारताचाच…

पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या, पाण्याचा मारा आणि गोळीबारही केला, मात्र इम्रानच्या समर्थकांनी पोलिसांना इम्रानपर्यंत पोहोचू दिले नाही. लाहोर हायकोर्टाने पोलिसांना त्यांची कारवाई तात्काळ थांबवण्याचे निर्देश दिल्याने हा हायव्होल्टेज ड्रामा संपला.

22 तासांनंतरही इम्रानला न घेता पोलीस परतले

आता पोलिस इम्रानच्या घरातून परतले आहेत. लाहोरमध्ये क्रिकेट सामना होणार असून यादरम्यान तेथील वातावरण शांत राहिल्याने इम्रान खान याना तूर्तास अटक होणार नसल्याचे मानले जात आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज