Download App

Covid Vaccine: नाकावाटे घेण्यात येणारी ‘ही’ लस बाजारात दाखल

नवी दिल्ली : भारताच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने (Bharat Biotech International Limited) निर्मित इन्कोव्हॅक (iNCOVACC BBV154) या नाकावाटे दिली जाणारी लस आज बाजारात आणली आहे. ज्यांना Covishield आणि Covaxin चे दोन्ही डोस मिळाले आहेत त्यांच्यासाठी हे बूस्टर डोस म्हणून काम करेल.

यासोबतच जागतिक महामारी कोरोना विषाणूविरुद्ध आणखी एक शस्त्र तयार करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे. जगातील पहिली मेड-इन-इंडिया इंट्रानासल लस केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या निवासस्थानी लॉन्च करण्यात आली.

भारत बायोटेकने डिसेंबरमध्ये घोषणा केली होती की ते भारतात विकसित केलेल्या नाकाची लस 325 रुपये प्रति शॉटमध्ये विकतील. हा दर सरकारी काम करणाऱ्या केंद्रांना लागू असेल, तर खासगी रुग्णालयांमध्ये प्रति शॉट 800 रुपये दराने दिला जाईल.

काही दिवसांच्या अंतराने कोरोनाबाबत काही ना काही बातम्या येतात, त्यामुळे आपण अस्वस्थ होतो. पण आता मोठा दिलासा म्हणून शास्त्रज्ञांनी नाकातील लस लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम पूर्ण केले आहे. ही अनुनासिक लस बूस्टर डोस म्हणून वापरली जाईल. ही लस व्हायरसचा संसर्ग आणि प्रसार रोखेल.

ही लस नाकातून फवारणी करून दिली जाते, म्हणजे लस घेणाऱ्या व्यक्तीच्या हातावर ही लस लावली जात नाही. DCGI ने सध्या 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी इंट्रानासल कोविड लस मंजूर केली आहे. नाकाची लस अधिक चांगली आहे, कारण ती लावणे सोपे आहे आणि लस रोगप्रतिकारशक्ती निर्माण करते, ज्यामुळे संसर्गास सुरुवातीस प्रतिबंध होतो. ही लस फक्त 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना दिली जाईल. 12 ते 17 वर्षे वयोगटातील बालकांनाही लसीकरण सुरू आहे, मात्र त्यांना ही लस अद्याप देता येणार नाही.

Tags

follow us