‘चीनमधील वाढत्या कोरोनाच्या बातम्या चिंताजनक, पण…’ – अदर पूनावाला

पुणे : ‘चीनमधील वाढत्या कोरोना केसेसच्या बातम्या चिंताजनक आहेत. पण आपल्याकडे उत्कृष्ट लसीकरण झाले आहे. कोरोना रूग्णांना तात्काळ ट्रॅक केले जाते. त्यामुळे घाबरून जाऊ नका. सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करा. त्यावर विश्वास ठेवा.’ असा सल्ला सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी दिला आहे. कोरोनाची सुरूवात चीनमध्ये झाली होती आणि आता चीनमध्ये पुन्हा […]

WhatsApp Image 2022 12 21 At 1.48.41 PM

WhatsApp Image 2022 12 21 At 1.48.41 PM

पुणे : ‘चीनमधील वाढत्या कोरोना केसेसच्या बातम्या चिंताजनक आहेत. पण आपल्याकडे उत्कृष्ट लसीकरण झाले आहे. कोरोना रूग्णांना तात्काळ ट्रॅक केले जाते. त्यामुळे घाबरून जाऊ नका. सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करा. त्यावर विश्वास ठेवा.’ असा सल्ला सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी दिला आहे.

कोरोनाची सुरूवात चीनमध्ये झाली होती आणि आता चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. या पार्श्वभुमीवर सरकारकडून अत्यंत खबरदारी घेण्यात येत आहे. पहिल्या लॉकडाउनप्रमाणे शहरांना सील करण्यात आले आहे. हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान भारतात देखील कोरोना रूग्ण वाढणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

यावर कोरोना अ‍ॅडव्हायजरी संघाने उत्तर दिले आहे की, भारतात कोरोनामुळे चिंता करण्याचे कारण नाही. कारण भारतात लसीकरण आणि लोकांची नैसर्गिक प्रतिकारक शक्ती उत्तम आहे.

जगभरात अनेक देशांमध्ये कोरोनाच झपाट्याने प्रसार होत आहे. यामध्ये जापान, अमेरिका आणि कोरिया या देशांमध्ये कोरोना रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभुमीवर निर्बंध लागू करण्यात येत आहेत. मात्र भारतात कोरोना रूग्णांची संख्या वाढताना दिसत नाहिये. तर सरकारकडून खबरदारी घेण्यात येत आहेत.

Exit mobile version