भारत-चीनमध्ये निर्माण झालेली दरी आता आणखीन वाढणार असल्याचं दिसून येत आहे, कारण भारतात पार पडणाऱ्या जी-20 परिषदेकडे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे आता चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग जी-20 परिषदेत सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे, याउलट चीनचे पंतप्रधानांना ली कियांग या परिषदेसाठी पाठवण्यात येणार असल्याचं चीनकडून जाहीर करण्यात आलं आहे.
World Cup 2023 : चमकदार कामगिरी करूनही निवडकर्त्यांचं मनं जिंकू न शकलेले पाच खेळाडू
चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी सांगितलं की, पंतप्रधान ली कियांग हे भारतातील नवी दिल्लीत होणाऱ्या जी-20 शिखर परिषदेसाठी शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत, भारताच्या निमंत्रणानंतर आता ली कियांग हे 10 सप्टेंबरला होणाऱ्या जी-20 परिषदेत सहभागी होणार आहेत. राष्ट्राध्यक्ष जिनपिंग परिषदेला येणार नसल्याने भारत-चीनमधला संघर्ष आणखीनच वाढणार असल्याची शक्यता आहे.
Pankaja Munde : पंकजा मुंडेंची शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरू, आगामी निवडणुकांत समीकरणे बदलणार?
पुढे बोलताना माओ म्हणाले, ‘जागतिक अर्थव्यवस्था ढासळत चालली असून जागतिक विकासापुढे अनेक आव्हाने वाढत चालली आहेत. जी-20 हे आर्थिक सहकार्याचे मुख्य व्यासपीठ असून जी-20 मुळे जागतिक अर्थव्यवस्था, जागतिक विकासातील आव्हानांना तोंड देण्यासाठीच उपयुक्त ठरणार असल्याचंही माओ यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, शी जिनपिंग जी – 20 परिषदेला उपस्थित राहणार नसल्याने चीन भारतात होत असलेल्या जी-20 परिषदेला अधिक महत्व देत नसल्याचं दिसून येत आहे. याआधी जिनपिंग हे दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या BRICS परिषदेत सहभागी झाले, त्यानंतर आता ते भारतात येण्यासाठी टाळत असल्याचं दिसून येत आहे.