World Cup 2023 : चमकदार कामगिरी करूनही निवडकर्त्यांचं मनं जिंकू न शकलेले पाच खेळाडू

  • Written By: Published:
World Cup 2023 : चमकदार कामगिरी करूनही निवडकर्त्यांचं मनं जिंकू न शकलेले पाच खेळाडू

Team India For World Cup 2023 : आगामी विश्वचषकासाठी भारतीय संघाची अखेर घोषणा करण्यात आली असून, कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वाखाली अनुभवी खेळाडूंना संघात स्थान देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, असे पाच खेळाडू आहेत ज्यांनी चमकदार कामगिरी करूनही त्यांना संघात स्थान देण्यात आलेले नाही.

IND VS NEP : नेपाळचा ‘कबीर खान’ ज्याने बदलले क्रिकेट संघाचे नशीब

दीपक चहर (Dipak Chahar)

एकदिवसीय सामन्यात दीपक चहरचा शानदार रेकॉर्ड राहिलेला आहे. त्याने 2018 च्या आशिया कपमध्ये पहिला सामना खेळला होता. 13 मॅचमध्ये चहरने 16 विकेट्स घेतल्या आहेत. तर, फलंदाजीत त्याने 33.83 च्या सरासरीने 203 धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. दीपकने शेवटचा वनडे सामना 2022 मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला होता.

वॉशिंग्टन सुंदर (washington sundar)

ऑफस्पिनर असल्याने अनेक माजी क्रिकेटपटू वॉशिंग्टन सुंदरला वर्ल्डकपसाठी संघात स्थान देण्याची मागणी करत होते. कारण सुंदर पॉवरप्लेमध्ये चांगली गोलंदाजी करू शकतो असे जाणकारांचे मत होते. सुंदरने आपल्या 16 सामन्यांच्या वनडे कारकिर्दीत 233 धावा करत 16 बळी घेतले आहेत. मात्र निवडकर्त्यांनी डावखुरा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलसह रवींद्र जडेजाला विश्वचषक संघात स्थान दिले आहे.

BCCI Media Rights : BCCI ची चांदी; Viacom-18 ने घेतले 5,963 कोटीत मीडियाचे अधिकार

युजवेंद्र चहल (yujvendra chahal)

युजवेंद्र चहल हा व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये भारताचा आघाडीचा खेळाडू मानला जातो. यानंतरही चहलला विश्वचषक संघात स्थान मिळालेले नाही. 72 सामने खेळलेल्या चहलच्या नावावर 121 वनडे विकेट आहेत. आज जाहीर झालेल्या संघात केवळ एक फिरकी गोलंदाज असलेल्या कुलदीप यादवला स्थान देण्यात आले आहे. आशिया चषकातही चहलला भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही. गेल्या 10 एकदिवसीय सामन्यांमध्ये चहलला 8 वेळा गोलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि त्याने 17 बळी घेतले आहेत. असे असतानाही चहलला संधी देण्यात आलेली नाही.

प्रसिद्ध कृष्ण (prasidh krishna)

प्रसिद्ध कृष्णाने केवळ 14 एकदिवसीय सामन्यांमध्ये 25 फलंदाजांना बाद केले आहे. बुमराहप्रमाणे तोही दुखापतीतून परतला आहे. त्याला संघात स्थान दिले असते तर त्याच्या उंचीमुळे फलंदाजांना बाउंस बॉलिंग करत वचक ठेवण्यास मदत झाली असती.

अहमदाबादमध्ये रंगणार विश्वचषकाचा शानदार उद्घाटन सोहळा; 10 संघाच्या कर्णधारांची हजेरी

संजू सॅमसन (sanju samson)

वरील खेळाडूंप्रमाणे संजू सॅमसनलाही वर्ल्डकपसाठी भारतीय संघात स्थान मिळवता आलेले नाही. 28 वर्षीय संजूने आतापर्यंत भारतासाठी 13 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 12 डावात 55.71 च्या सरासरीने आणि 104 च्या स्ट्राईक रेटने 390 धावा केल्या आहेत. तसेच त्याच्या नावावर तीन अर्धशतकही आहेत. मात्र केएल राहुलच्या फिटनेसमुळे त्याला संघात स्थान मिळू शकले नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube