Download App

India Canada Row : भारताच्या एका निर्णयामुळे डळमळीत होऊ शकते कॅनडाची एजुकेशन इकोसिस्टम

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी आणि समर्थक निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडा या देशातील संबंध ताणले गेले आहेत. निज्जरच्या हत्येमागे भारताचा हात असल्याच्या आरोपानंतर भारताने कॅनडियन नागरिकांना अनिश्चित काळासाठी व्हिजा न देण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. कॅनडाच्या अर्थव्यवस्थेत भारतीय विद्यार्थांचा मोठा वाटा असून, भारताकडून याबाबत कठोर निर्णय घेण्यात आल्यास कॅनडाची एजुकेशन इकोसिस्टम डळमळीत होऊ शकते. (India Canada Row Affect Canada Education System)

India Canada Conflict : अजेंडा 2024, आता भारत विरुद्ध कॅनडा; ठाकरे गटाकडून मोदी सरकार लक्ष्य

कॅनडाची अर्थव्यवस्था (Canada Economy) एकट्या भारतावर अवलंबून असून, 4.9 अब्ज डॉलर इतकी मोठी उलाढाल भारताकडून होते. भारताने कॅनडातील शिक्षण पद्धतीबाबत कठोर निर्णय घेतल्यास 2.2 ट्रिलियन जीडीपी अर्थव्यवस्था कोलमडू शकते. दोन्ही देशातील वाढत्या तणावांमुळे अनेक भारतीय कंपन्या कॅनडातून बाहेर पडत आहेत.

भारतीयांसह जगभरातील करोडो विद्यार्थी कॅनडामध्ये भरघोस फी भरून शिक्षण घेतात. यामुळे कॅनडाची अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होत आहे. येथील शिक्षणासाठी परदेशी विद्यार्थांकडून कॅनडियन विद्यार्थांपेक्षा 4 ते 5 पट अधिकचे शुल्क आकराले जाते, अशा परिस्थितीत भारताकडून शिक्षणाबाबत काही कठोर निर्बंध लादण्याचा विचार केला गेल्यास हा कॅनडासाठी मोठा धक्का असेल.

India Canada Row : निज्जरच्या हत्येनंतर कॅनडातील हिंदूंना 1985 सारखी भीती; वाचा काय घडलं होतं?

4.9 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था भारतावर अवलंबून

भारत आणि कॅनडातील वाढत्या तणावात भारत सरकारने भारतीय विद्यार्थांना कॅनडामध्य जाण्यास बंदी घातल्यास याचा थेट परिणाम कॅनडाच्या अर्थव्यवस्थेवर पडू शकतो. कारण, या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी भारतीय विद्यार्थांकडून स्थानिक विद्यार्थ्यांच्या तुलनेत 4 ते 5 पट अधिकचे शुल्क आकारले जाते. कॅनडामध्ये सुमारे 8 लाख आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आहेत. ज्यामध्ये 40 टक्के भारतीय आहेत.

Justin Trudeau : जस्टिन ट्रूडो अन् वाद विवाद; पंतप्रधान असतानाच घेतला होता घटस्फोट…

कॅनडाच्या अर्थव्यवस्थेत एकट्या भारतीय विद्यार्थ्यांचे योगदान हे 4.9 अब्ज डॉलर्स असून, येथील अनेक खाजगी विद्यापीठे केवळ भारतीय विद्यार्थ्यांच्या जोरावर चालत आहेत. त्यामुळे वाढत्या तणावात भारताने शिक्षणाबाबत बंदी घातल्यास कॅनडाची शिक्षण व्यवस्था आणि संपूर्ण खासगी महाविद्यालयातील अर्थिक गणितं विस्कळीत होऊ शकते.

Tags

follow us