India Canada Tension : खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांनंतर दोन्ही देशांतील संबंध (India Canada Tension) प्रचंड ताणले गेले होते. भारताने ताठर भूमिका घेत जशास तसे उत्तर देण्याचा सपाटाच लावला होता. अखेर भारताचे हे धोरण पाहता ट्रुडो नरमले आहेत. भारत एक वाढती शक्ती असून आम्ही भारताशी घनिष्ठ संबंध ठेवण्याबाबत प्रतिबद्ध आहोत असे वक्तव्य ट्रुडो यांनी केले आहे. काल गुरुवारी ट्रुडो यांनी एका पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केले.
Iraq Fire Accident: इराकमध्ये लग्नमंडपात मृत्यूचं तांडव; 100 जणांचा मृत्यू तर 150 हून अधिक जखमी
ते म्हणाले, भारत एक वाढती आर्थिक शक्ती आणि महत्वाचा भू-राजकीय देश आहे. मागील वर्षी आम्ही सादर केलेल्या इंडो-पॅसेफिक नीतीप्रमाणे आम्ही भारतासोबत संबंध ठेवण्याबाबत गंभीर आहोत. यासोबत भारताने सुद्धा या प्रकरणाच्या (हरदीप सिंह निज्जर हत्या) तपासात कॅनडाला सहकार्य करावे असेही ट्रुडो म्हणाले.
कॅनडाच्या (Canada) नागरिकाच्या स्वतःच्या भूमीवर झालेल्या हत्येमध्ये अन्य कोणत्याही देशाचा किंवा परदेशी सरकारचा सहभाग खपवून घेतला जाणार नाही. हे आमच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे. गेल्या काही आठवड्यांपासून कॅनडाच्या सुरक्षा एजन्सी कॅनडाचे नागरिक हरदीप सिंग निज्जर आणि भारत सरकार यांच्यातील संबंधांची चौकशी करत आहेत. जी 20 शिखर परिषदेतही कॅनडाने भारत सरकारच्या उच्च गुप्तचर अधिकाऱ्यांकडे चिंता व्यक्त केली होती.
पंतप्रधान मोदी यांनी देखील कॅनडातील अतिरेकी घटकांकडून केल्या जात असलेल्या भारतविरोधी कारवायांबद्दल चिंता व्यक्त केली होती. खलिस्तानी अतिरेकी निज्जर याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप ट्रुडो यांनी केला होता. त्यांच्या या आरोपानंतरच खऱ्या अर्थाने भारत आणि कॅनडा यांच्यातील वादाला सुरुवात झाली.
ट्रुडो यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त भारत सरकारनेही जशास तसे उत्तर दिले होते. तसेच कॅनडाच्या राजनयिकाला देश सोडण्याच्या सूचना दिल्या. अशा परिस्थितीत दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढला आहे. कॅनडा सरकारने ट्रॅव्हल अॅडव्हायजरी जारी करत या वादात आणखी तेल ओतण्याचे काम केले होते. या वादावर आता भारत सरकारनेही कॅनडातील नागरिकांसाठी भारताचा व्हिसा बंद केला होता.
Canada : खलिस्तानी अतिरेक्याच्या हत्येत भारताचा हात; कॅनडाच्या पंतप्रधानांच्या वक्तव्याने खळबळ !