Iraq Fire Accident: इराकमध्ये लग्नमंडपात मृत्यूचं तांडव; 100 जणांचा मृत्यू तर 150 हून अधिक जखमी
Iraq Fire Accident: उत्तर इराकच्या नेवेहमधील अल-हमदानिया (Al Hamdaniya)या ठिकाणी लग्नमंडपात भीषण आग (Fire ) लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण आगीत वधू आणि वरासह १०० जणांचा जळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच यामध्ये १५० हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. नेवेह प्रांत मोसुलच्या बाहेर राजधानी बगदादपासून जवळपास ३३५ किमी अंतरावर आहे. या घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. तसेच मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
رئيس مجلس الوزراء @mohamedshia يوجه وزيري الداخلية والصحة باستنفار كل الجهود لإغاثة المتضررين جراء حادث الحريق بقضاء الحمدانية في سهل نينوى. pic.twitter.com/YMTCMSdC10
— Government of Iraq – الحكومة العراقية (@IraqiGovt) September 26, 2023
उत्तर इराकच्या नेवेहमधील अल-हमदानिया भागामध्ये एक लग्न कार्यक्रम सुरु होता. हा कार्यक्रम सुरू असतांना अचानक भीषण आग लागल्याने वऱ्हाडी सैरावैरा पळू लागले होते. आणि काही क्षणामध्येच आगीने उग्र रूप धारण केल्याने यामध्ये १०० जणांचा जळून मृत्यू आला आहे. तर १५० जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ही आग नेमकी कशामुळे लागली आहे याची माहिती अद्याप समोर आली नाही. इराकी वृत्तसंस्थाने या आगीचे काही फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात अग्निशामक दलाचे कर्मचारी करत असल्याची माहिती मिळाली आहे.
इराकी वृत्तसंस्थानी दिलेल्या माहितीनुसार लग्नमंडपात असलेल्या ज्वलनशील पदार्थांमुळे ही आग लागली असल्याचे सध्या सांगितले जात आहे. सुरवातीला या भीषण आगीचा भडका उडाला आणि काही वेळातमध्येच संपूर्ण लग्न मंडप आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे सांगितले जात आहे. तसेच घटनास्थळी चित्रित केलेल्या व्हिडिओत अग्निशमन दलाचे जवान नागरिकांना वाचवत असल्याचे बघताना मिळत आहे. आणि स्थानिक वेळेनुसार ही आग रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास ही भीषण आग लागली आहे. आणि शेकडो जण लोक लग्नमंडपाच्या लग्नसोहळामध्ये गर्क होते. सध्या या घटनास्थळी रुग्णवाहिका आणि वैद्यकीय मदत केली जात आहे. तसेच जखमींनी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.
या घटनेबद्दल इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल सुदानी यांनी अधिकाऱ्यांना या घटनेमुळे जखमी झालेल्या लोकांना तात्काळ पाहिजे ती मदत करण्याची घोषणा केली आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते सैफ अल-बद्र यांनी सांगितले आहे की, “दुर्दैवी अपघातामुळे बाधित झालेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदैनी यांनी या घटनेच्या सखोल चौकशी करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले आहे. तसेच निनवेचे प्रांतीय गव्हर्नर नजीम अल-जबौरी यांनी सांगितले आहे की, काही जखमींना लवकरात लवकर प्रादेशिक हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. आगीतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तसेच या घटनेबाबत सध्या कोणतीही माहिती देण्यात आली नाही. परंतु या घटनास्थळी लावलेल्या फटाक्यांमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. इराकमध्ये ख्रिश्चनांची संख्या सुमारे १ लाख ५० हजार इतकी आहे. तर २०१५ साली ही संख्या सुमारे १५ लाख असल्याची माहिती मिळाली आहे. इराकची एकूण लोकसंख्या ४ कोटीपेक्षा जास्त आहे.