ऑस्ट्रेलियातील दहशतवादी हल्ल्याचं इंडिया कनेक्शन! हल्लेखोराने 27 वर्षांपूर्वा देश सोडत केलं ख्रिश्चन महिलेशी लग्न

Australia terror attack नंतर आता यातील एक हल्लेखोर भारतातील असल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.

Australia Terror Attack

Australia Terror Attack

India connection to Australia terror attack! Attacker married a Christian woman after leaving the country 27 years ago : ऑस्ट्रेलियातील(Austrelia) सिडनीच्या(Sydney) बोंडी बीचवर रविवारी 14 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी दोन व्यक्तींनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. हा एक दहशतवादी हल्ला होता. त्यानंतर आता यातील एक हल्लेखोर भारतातील असल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या बोंडी बीच हल्ल्याचं इंडिया कनेक्शन!

हल्लेखोर साजित अकरम भारतील होता. 50 वर्षांचा असून तो तेलंगानाच्या हैदराबादमधील राहिवासी होता. हैदराबादमधून त्याने बीकम केले आणि स्टुडंट व्हिसावर नोकरी शोधण्यासाठी नोव्हेंबर 1998 रोजी तो ऑस्ट्रेलियामध्ये गेला होता. त्यानंतर त्याने युरोपीय महिला वेनेरा ग्रोसोशी विवाह केला आणि तेथेच स्थायिक झाला.

‘शिल्पकलेचा कोहिनूर’ , भीष्माचार्य काळाच्या पडद्याआड! दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची राम सुतारांना श्रद्धांजली

मात्र त्याच्याकडे अद्यापही भारतीय पासपोर्ट आहे. त्याच्या कुटुंबाने माध्यमांना सांगितलं की, त्यांनी अनेक वर्षांपूर्वी त्याच्याशी संबंध तोडलेले आहेत. कारण त्याने एका ख्रिश्चन महिलेशी विवाह केला होता. तर नवीद अकरम हा 24 वर्षीय असून तो मात्र ऑस्ट्रेलियाचा नागरिक आहे. त्याला एक मुलगी देखील आहे. तसेच तेलंगाना पोलिसांच्या माहितीनुसार भारतात त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

नेमकं प्रकरण काय?

ऑस्ट्रेलियातील(Austrelia) सिडनीच्या(Sydney) बोंडी बीचवर रविवारी 14 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी दोन व्यक्तींनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. हा एक दहशतवादी हल्ला होता. हे दोन हल्लेखोर पिता-पुत्र आहेत. ते मुस्लिम असून त्यांचं पाकिस्तान कनेक्शन असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या हल्ल्याची पूर्वसूचना ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना दिल्याचा दावा इस्रायलने केला आहे. 

Exit mobile version