‘शिल्पकलेचा कोहिनूर’ , भीष्माचार्य काळाच्या पडद्याआड! दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची राम सुतारांना श्रद्धांजली

Ram Sutar यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांच्या निधनानंतर राज्याचे दोनही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Ram Sutar

Both Deputy Chief Ministers Eknath Shinde and Ajit Pawar pay tribute to Ram Sutar : शिल्पकला विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. कारण महान विश्वविख्यात शिल्पकार, महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 101 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर राज्याचे दोनही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

सुतारांच्या निधनानेशिल्पकलेचा कोहिनूरकाळाच्या पडद्याआडशिंदे

शिल्पकलेतील उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या राम सुतार यांनी आपल्या कलेच्या जोरावर भारतीय संस्कृती आणि महापुरुषांचे विचार जगभर पोहोचवले. त्यांच्या प्रदीर्घ योगदानासाठी त्यांना केंद्र सरकारतर्फेपद्मभूषणपुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.राम सुतार यांनी महाराष्ट्राच्या मातीतून आपल्या कलेला सुरुवात केली आणि जागतिक स्तरावर स्थान मिळवले. महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मानमहाराष्ट्र भूषणपुरस्कार त्यांना प्रदान करण्यासाठी काही महिन्यांपूर्वीच आम्ही त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी गेलो होतो.

धमाल मनोरंजक ‘गोट्या गँगस्टर’चा ट्रेलर लाँच! ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार चित्रपट

त्यावेळी झालेली त्यांची भेट शेवटची ठरली, असे उपमुख्यमंत्र्यांनी शोक संदेशात म्हटले आहे. नर्मदा तीरावरील सरदार वल्लभभाई पटेल यांचास्टॅच्यू ऑफ युनिटी‘, संसदेतील महात्मा गांधींचा पुतळा अशा अनेक अजरामर कलाकृतींच्या माध्यमातून ते सदैव आपल्यात जिवंत राहतील. वयाच्या १०१ व्या वर्षापर्यंत कलेची साधना करणाऱ्या सुतार यांनी नवीन पिढीतील हजारो कलाकारांना मार्गदर्शन केले. त्यांच्या जाण्याने शिल्पकलेचे विद्यापीठच हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

शिल्पकलेतील भीष्माचार्य काळाच्या पडद्याआडअजित पवार

राम सतार यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात शेकडो शिल्प साकारली. त्यांचे प्रत्येक शिल्प अप्रतिम सौंदर्याचा अद्भुत नमुना आहे. छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,सरदार वल्लभभाई पटेल या महामानवांच्या शिल्पातून त्यांनी देशाचा इतिहास जिवंत केला.या महामानवांचे कार्य, विचार सर्वांपर्यंत पोहोचवले.गेल्याच महिन्यात त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नोएडा येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन राज्य शासनाच्या वतीने त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मानाने प्रदान करण्यात आला होता.आणि अभिजात भाषा दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला होता.त्यावेळी त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला होता.

महान शिल्पकार हरपले! महाराष्ट्र भूषण राम सुतारांचं निधन; कशी होती कारकिर्द?

राम सुतार यांनी महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून येऊन दिल्लीत आपलं अढळ स्थान निर्माण केलं. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी काम केलं. यातून त्यांची कामाप्रती निष्ठा दिसून येते.एवढ्या मोठ्या पदावर पोहोचल्यावरही ते प्रत्येकाशी आत्मीयतेने, आपुलकीने बोलत.साधेपणा आणि नम्रपणा हा त्यांचा स्थायीभाव होता. देशभरातील अनेक मूर्तिकारांना घडवण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते.दगडातून जिवंत भावना साकारणारा जादूगार आज शांत झाला असला तरी त्यांनी घडवलेली शिल्पे युगानुयुगे त्यांची आठवण करून देत राहतील. राम सुतार यांचे निधनाने भारतीय स्मारक शिल्पांना जागतिक पातळीवर ओळख मिळवून देणारा उत्तुंग प्रतिभेचा शिल्पकार आपण गमावला आहे.त्यांच्या कुटूंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राम सुतार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

follow us