महान शिल्पकार हरपले! महाराष्ट्र भूषण राम सुतारांचं निधन; कशी होती कारकिर्द?
Ram Sutar यांचं वृद्धापकाळाने वयाच्या 101 व्या वर्षी निधन झालं त्यांनी शिल्पांना केवळ आकारच नाही, तर भारताची ओळख जागतिक पातळीवर नेली
Internationally renowned sculptor Ram Sutar passes away at the age of 101 : शिल्पकला विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. कारण महान विश्वविख्यात शिल्पकार, महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 101 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कारकिर्दीबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी शिल्पांना केवळ आकारच दिला नाही, तर प्रतिभेने भारताची ओळख जागतिक पातळीवर उजळून निघाली.
त्यांच्या निधनानंतर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी भावनिक पोस्ट केली आहे. ते म्हणाले की, ‘महान शिल्पकार हरपले! विश्वविख्यात शिल्पकार, महाराष्ट्र भूषण राम सुतार जी यांनी शिल्पांना केवळ आकारच दिला नाही, तर त्यात राष्ट्राचा आत्मा, संस्कृतीचा अभिमान आणि इतिहासाचे जिवंत दर्शन घडवले.
<iframe src=”https://www.facebook.com/plugins/post.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2FAdvocateAshishShelar%2Fposts%2Fpfbid0aNn7xBhKpqtE2PGnsoHKWUDwDsEzitESpVYmNUyj6LBpVKyHxJUrmtwSKDKELQLKl&show_text=true&width=500″ width=”500″ height=”718″ style=”border:none;overflow:hidden” scrolling=”no” frameborder=”0″ allowfullscreen=”true” allow=”autoplay; clipboard-write; encrypted-media; picture-in-picture; web-share”></iframe>
त्यांच्या प्रतिभेने भारताची ओळख जागतिक पातळीवर उजळून निघाली. कला, साधना आणि समर्पणाचा हा तेजस्वी वारसा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत कायम प्रेरणादायी राहील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि सुतार कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! ॐ शांती.‘
कशी होती कारकिर्द?
राम सुतार यांनी जगभरामध्ये 200 हून अधिक शिल्प साकारली आहेत. त्यात दिल्लीमध्ये संसद भवनाच्या प्रांगणात त्यांनी तब्बल 16 शिल्प बनवलेली आहेत. त्यात सर्वांत उल्लेखनीय आणि चर्चेतील शिल्पाबद्दल सांगायचं झालं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटीचा समावेश आहे. तसेच जवाहर लाल नेहरू आणि गोविंद वल्लभ पंत या सारखी भव्य शिल्प त्यांनी साकारली आहेत.
तसेच त्यांनी देशात अनेक नेत्यांसह विदेशात महात्मा गांधींचे असंख्य पुतळे घडवले आहेत. तर त्यांच्या या कलेमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा इतिहास आणि वारसा जगभर पोहचला आहे. त्याच्या कामगिरीसाठी त्यांना पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण सारख्या पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे.
