Download App

India Maldives : दणका बसलाच! मालदीवला रोज 9 कोटींचं नुकसान; भारतीयांसाठी घेतला ‘खास’ निर्णय

India Maldives Row : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच (PM Narendra Modi) लक्षद्वीप दौरा (Lakshadweep) केला. त्यानंतर त्यांनी त्यांचे फोटोही शेअर केले. पण त्यांच्या या दौऱ्यावर मालदीवकडून (India Maldives Row) अत्यंत खालच्या भाषेत टीका (India Maldives Tension) करण्यात आली. मालदीवच्या युवा सक्षमीकरण, माहिती आणि कला उपमंत्री मरियम शिउना यांनी नरेंद्र मोदींसाठी ‘जोकर’ आणि ‘इस्रायलची कठपुतली’ असे शब्द वापरले. मालदीव सरकारनेही या प्रकाराची गंभीर दखल घेत टीका करणाऱ्या मंत्री शिउनासह आणखी दोन मंत्र्यांना (Ministers) निलंबित केले. मात्र तरीदेखील हा वाद शांतता झालेला नाही.

भारतीय नागरिकांनी आता मालदीवच्या पर्यटनाचे कंबरडे मोडण्याचे मनोमन ठरवल्याचे दिसत आहे. भारतीय पर्यटकांनी मालदीव टूरवर बहिष्कार टाकल्यानंतर मालदीवच्या अर्थव्यवस्थेला झटके बसण्यास सुरुवात झाली आहे. मालदीवला सध्या दररोज 9 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. मालदीवच्या ट्रॅव्हल एजन्सींनी सांगितले की या परिस्थितीमुळे देशातील जवळपास 44 हजार कुटुंब प्रभावित होणार आहेत.

भारताला नडले, जनतेनेच धुतले! स्थानिक निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष मोइज्जू यांचा पक्ष पराभूत

भारतीयांच्या बहिष्कारानंतर रोज 9 कोटींचा फटका 

या नव्या आर्थिक संकटात फसलेल्या मालदीव सरकारनेच खुलासा केला आहे की भारतीयांनी बॉयकॉट केल्यामुळे देशातील 44 हजार परिवारांसमोर संकट उभे राहिले आहे. भारतीयांच्या नाराजीमुळे मालदीवचा पर्यटन व्यवसाय प्रचंड नुकसान सहन करत आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मालदीव सरकारने आता मालदीव टूरचा खर्च निम्मा केला आहे तरी देखील भारतीय पर्यटक मालदीवला जाण्यास तयार नाहीत.

भारतीयांकडून मालदीवला 11 टक्के उत्पन्न

भारतातून मालदीवला जाणाऱ्या विमानाचे तिकीटदर 20 हजार रुपयांवरून 12 ते 15 हजारांपर्यंत खाली आले आहेत. MakeMyTrip च्या वेबसाइटवर दिल्ली ते मालदीवचे प्रवास भाडे फक्त 8 हजार 215 इतकेच दाखवत आहे. दिल्ली आणि चेन्नईचे प्रवास भाडे सुद्धा यापेक्षा (8245) जास्त आहे. मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार 2023 मध्ये 18 लाख लोकांनी मालदीवला भेट दिली होती. यामध्ये 2 लाख 9 हजार 198 भारतीय पर्यटक होते. मालदीवच्या पर्यटनाच्या एकूण उत्पन्नापैकी 11.1 टक्के उत्पन्न भारतीय पर्यटकांद्वारे होते. यानंतर रशिया (209146), चीन (187118), ब्रिटेन (155730) आणि जर्मनीचे (135090) पर्यटक आहेत.

India Maldives Tension : भारतीयांचा झटका! फक्त 3 दिवसांत ‘इतक्या’मालदीव टूर रद्द

follow us

वेब स्टोरीज