भारताला नडले, जनतेनेच धुतले! स्थानिक निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष मोइज्जू यांचा पक्ष पराभूत

भारताला नडले, जनतेनेच धुतले! स्थानिक निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष मोइज्जू यांचा पक्ष पराभूत

India Maldives Tension : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच (PM Narendra Modi) लक्षद्वीप दौरा (Lakshadweep) केला. त्यानंतर त्यांनी त्यांचे फोटोही शेअर केले. पण त्यांच्या या दौऱ्यावर मालदीवकडून (Maldives) अत्यंत खालच्या भाषेत टीका (India Maldives Tension) करण्यात आली. मालदीवच्या युवा सक्षमीकरण, माहिती आणि कला उपमंत्री मरियम शिउना यांनी नरेंद्र मोदींसाठी ‘जोकर’ आणि ‘इस्रायलची कठपुतली’ असे शब्द वापरले. मालदीव सरकारनेही या प्रकाराची गंभीर दखल घेत टीका करणाऱ्या मंत्री शिउनासह आणखी दोन मंत्र्यांना (Ministers) निलंबित केले. मात्र तरीदेखील हा वाद शांतता झालेला नाही.

चीनच्या दौऱ्यावरुन परतल्यानंतर  राष्ट्राध्यक्ष मोइज्जू यांनी भारताविरुद्ध वक्तव्य केले मात्र दुसरीकडे त्यांच्याच देशातील लोकांनी त्यांच्या पक्षाला जोरदार झटका दिला. मालदीवमधील स्थानिक निवडणुकीत मोइज्जू यांचा पक्ष पराभूत झाला आहे. भारताविरोधात मालदीव सरकारने घेतलेल्या चुकीच्या धोरणाला नागरिकांनी दिलेले हे सणसणीत उत्तर असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

India Maldives Tension : मालदीवमध्ये राजकीय भूकंप? विरोधकांच्या ‘अविश्वासा’च्या हालचाली

मालदीवची राजधानी माले शहराच्या महापौर पदाच्या निवडणुकीत भारत समर्थक मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टीने विजय मिळवला आहे. पक्षाचे उमेदवार एडम अजीम मालेचे नवे महापौर म्हणून निवडले गेले आहेत. याआधी मोइज्जू हेच महापौर होते. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांना महापौरपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या निवडणुकीत विरोधी नेते एडम अजीम यांनी 5303 मतांची आघाडी घेतली. तर राष्ट्राध्यक्ष मोइज्जू यांच्या पक्षाच्या अझीमा शकूर यांना फक्त 3301 मते मिळाली. महापौर पदाची निवडणूक जिंकल्यानंतर विरोधी पक्षाला नवी राजकीय ताकद मिळाली आहे.

दरम्यान, चीनमधून मायदेशी परतल्यानंतर मुइज्जू यांनी भारताला अप्रत्यक्ष इशारा देण्याचा प्रयत्न केला. मुइज्जू म्हणाले, भलेही आम्ही लहान देश असू शकतो, असं असलं म्हणून कोणालाही आम्हाला धमकावण्याचा, दाबण्याचा परवाना मिळाला नाही. मुइज्जू यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख भारताकडे असल्याचे सांगण्यात येत आहे.

India Maldives Tension : भारतीयांचा झटका! फक्त 3 दिवसांत ‘इतक्या’ मालदीव टूर रद्द

मालदीव सरकारमधील तीन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेनंतर भारतीय प्रचंड संतापले होते. सोशल मीडियावर भारतीयांनी प्रचंड संताप व्यक्त केला. देशात सोशल मीडियावर #BoycottMaldives ट्रेंड करू लागला. यानंतर अनेक लोकांनी आपली मालदीव यात्रा (Maldives Tour) रद्द केल्याचेही सांगितले. मालदीवची अर्थव्यवस्था पूर्णपणे पर्यटनावरच अवलंबून आहे. यात भारतीय पर्यटकांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे सरकारला मंत्र्यांना निलंबित करण्याचा निर्णय घ्यावा लागला. विरोधी पक्षांनीही मंत्र्यांच्या या वक्तव्यावर प्रचंड टीका केली होती. या मंत्र्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणीही या नेत्यांनी केली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube