Download App

India Overtake China in Population: लोकसंख्येत भारत बनला अव्वल; चीनलाही टाकेल मागे

  • Written By: Last Updated:

India Overtake China in Population : युनायटेड नेशन्सने जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. भारतात सध्या चीनपेक्षा 20 लाख लोकसंख्या जास्त असून, देशाची लोकसंख्या 140 कोटींच्या पुढे गेली आहे. तर, दुसरीकडे चीनमधील जन्मदर खाली आला असून यंदा याची नोंद मायनसमध्ये नोंदवण्यात आली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, जागतिक तज्ज्ञांनी भाकीत केले होते की, 2023 मध्ये भारतात सर्वाधिक मृत्यू होतील आणि आता संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या (UNFPA) ताज्या आकडेवारीने याची पुष्टी केली आहे.

 

या वर्षाच्या मध्यापर्यंत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल. याबाबत बुधवारी युनायटेड नेशन्सने आकडेवारी जारी केली आहे.  UNFPA च्या स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2023 च्या डेमोग्राफिक डेटामध्ये चीनच्या 1.4257 अब्जांच्या तुलनेत भारताची लोकसंख्या 1,428.6 अब्ज इतकी आहे. यात आकडेवारीत अमेरिकेचा नंबर तिसऱ्या स्थानी असून, येथे 340 दशलक्ष लोकसंख्या आहे.  संयुक्त राष्ट्रांच्या मागील डेटाचा वापर करून भारत या महिन्यात लोकसंख्येबाबत चीनला मागे टाकेल असा अंदाज व्यक्त केला आहे.

भारताविरुद्धच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर; ‘या’ स्टार खेळाडूंचा समावेश

सहा दशकांत प्रथमच घटली चीनची लोकसंख्या

उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षी चीनची लोकसंख्या सहा दशकांत प्रथमच घटली आहे. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवरही होणार असल्याचे बोलले जात आहे. सरकारी आकडेवारीनुसार, भारताची वार्षिक लोकसंख्या 2011 पासून सरासरी 1.2 टक्के वाढली आहे, जी मागील 10 वर्षांत 1.7 टक्के होती.

भारतामध्ये जगातील सर्वात तरुण लोकसंख्या

UNFPA च्या अहवालानुसार भारतातील 25% लोकसंख्या 0-14 वयोगटातील आहे, 18% 10-19 वयोगटातील आहे, 10-24 वर्षे 26%,   15-64 वयोगटातील लोकसंख्या 68% आहे तर,65 वरील वयोगटातील लोकसंख्या  7 टक्के आहे.

Tags

follow us