भारतात आले आणखी १२ चित्ते; दक्षिण आफ्रिकेतून आलेले विमान ग्वालेरमध्ये उतरलं

दक्षिण आफ्रिका : दक्षिण अफ्रिकेतून (South Africa) ग्वाल्हेर या ठिकाणी आणखी १२ चित्ते (Cheetahs) आणण्यात आले आहेत. दक्षिण अफ्रिकेतून आणण्यात आलेल्या या पाहुण्यांना आता भारतात वास्तव्य करणार आहेत. या चित्त्यांना भारतीय वायुसेनेच्या गॅलेक्सी ग्लोबमास्टर सी १७ या विशेष विमानामधून ग्वाल्हेर या ठिकाणी आणण्यात आलं आहे. बॉक्समधून हे चित्ते भारतात आणले आहेत. या अभयअरण्यात राहणार चित्ते […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (39)

Cheetahs

दक्षिण आफ्रिका : दक्षिण अफ्रिकेतून (South Africa) ग्वाल्हेर या ठिकाणी आणखी १२ चित्ते (Cheetahs) आणण्यात आले आहेत. दक्षिण अफ्रिकेतून आणण्यात आलेल्या या पाहुण्यांना आता भारतात वास्तव्य करणार आहेत. या चित्त्यांना भारतीय वायुसेनेच्या गॅलेक्सी ग्लोबमास्टर सी १७ या विशेष विमानामधून ग्वाल्हेर या ठिकाणी आणण्यात आलं आहे. बॉक्समधून हे चित्ते भारतात आणले आहेत.

या अभयअरण्यात राहणार चित्ते

दक्षिण अफ्रिकेतून आणलेल्या १२ चित्त्यांना मध्य प्रदेशातील कूनो नॅशनल पार्कमध्ये (Kuno National Park) ठेवण्यात येणार आहे. याअगोदर चित्ते भारतात आणले आहेत. भारतात चित्त्यांची संख्येत वाढ करण्यात यावी, या अनुषंगाने दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यात एक करार झाला होता. याअगोदर ८ चित्ते भारतात आणले गेले आहेत. यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात १२ चित्ते आणले आहेत.

१९५२ मध्येच चित्ता नामशेष झाल्याचे घोषित

१९५२ मध्ये भारतातून चित्ता नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले. मध्य प्रदेशाच्या जंगलात सोडण्यात आले असलेले हे चित्ते नामिबियातील आहेत. त्यांना या नवीन वर्षांच्या सुरुवातीला स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य कराराखाली आणण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुनो नॅशनल पार्कमध्ये ८ चित्ते सोडले आहेत. कुनो नॅशनल पार्कमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते चित्ता सोडणे हा भारतातील वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासाचे पुनरुज्जीवन आणि वैविध्य आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा भाग असल्याचे, त्यांनी निवेदनात सांगितलं.

मोदी सरकारने १७ सप्टेंबर २०२२ या दिवशी म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी देशात ८ चित्ते आणण्यात आले होते. या चित्त्यांची चर्चा देशभर चांगलीच झाली. नामिबियातून हे चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात आणण्यात आले. १९४७ नंतर पहिल्यांदा भारतात चित्ते बघितले गेले. त्याअगोदर सुरजगुजाच्या राजाने जे आता छत्तीसगढमध्ये आहे, ३ चित्ते शिकारीत मारले होते. मात्र आता जे चित्ते आणले गेले आहेत, आता त्यानंतर १२ चित्त्यांची भर त्यामध्ये टाकण्यात आली.

Exit mobile version