Download App

मोठी बातमी : नेपाळमध्ये भीषण अपघात; 40 भारतीयांना घेऊन जाणारी बस कोसळली; 14 ठार

तनहुन जिल्ह्यातील मार्स्यांगडी नदीत ही बस कोसळली असून, बस पोखराहून काठमांडूच्या दिशेने जात होती. 

  • Written By: Last Updated:

काठमंडू : नेपाळमध्ये 40  भारतीस प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला भीषण अपघात (Road Accident) झाल्याचे वृत्त समोर आले आहे. ही बस नदीत कोसळ्याचे सांगितले जात आहे. तनहुन जिल्ह्यातील मार्स्यांगडी नदीत ही बस कोसळल्याचे सांगितले जात असून, यूपी एफटी 7623 नंबर प्लेट असलेली बस पोखराहून काठमांडूच्या (Kathmandu) दिशेने जात होती. या अपघातात  14 प्रवाशांच  मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची तीव्रता बघता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची  भीती व्यक्त केली जात आहे. (14 Indians Dead In Nepal Bus Accident)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, यूपी एफटी 7623 पासिंग नंबर प्लेट असलेली बस पोखराहून काठमंडूकडे निघाली होती. त्यावेळी अचानक तनहुन जिल्ह्यातील मार्स्यांगडी नदीत कोसळली. सकाळी 11.30 च्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले असून, अपघातग्रस्तांना नदीतून बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून, या अपघातात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे तर, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची भीषणता बघता मृतांचा आकडा वाढण्याची भीती स्थानिका पोलिसांनी व्यक्त केली आहे.

मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडचणी

मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, यामुळे मदत आणि बचावकार्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बसमध्ये 40 जण होते, त्यापैकी काहींना वाचवण्यात यश आले आहे. मात्र अजूनही अनेक लोक बेपत्ता आहेत. तानाहुन जिल्ह्यात हा अपघात झाल्याचे नेपाळ पोलिसांनी सांगितले आहे. बस उत्तर प्रदेशची असून, हे सर्वजण उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यातून नेपाळला गेले होते, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

प्रवाशांची माहिती काढण्यास सुरूवात

अपघातग्रस्त उत्तरप्रदेशातील असल्याचे समोर आल्यानंतर ही बस राज्यातील कोणत्या भागातून नेपाळला गेली होती त्याचा शोध घेतला जात असल्याचे उत्तर प्रदेशच्या आयुक्तांनी सांगितले आहे.

follow us