Train Accident : साबरमती एक्सप्रेस रुळावरून घसरली; मध्यरात्रीच्या घटनेने प्रवाशांत घबराट
Train Accident : देशात रेल्वे अपघातांच्या संख्येत सातत्याने (Train Accident) वाढ होत आहे. आताही रेल्वेचा अपघात झाला आहे. कानपूर आणि भीमसेन स्टेशन दरम्यान रेल्वेचे काही डबे रुळावरून घसरले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. साबरमती एक्सप्रेस कानपूर आणि भीमसेन (Uttar Pradesh) स्टेशनच्या दरम्यान असलेल्या एका ब्लॉक सेक्शनमध्ये रुळावरून घसरली. या अपघातात कोणीही जखमी अथवा मयत झाले नाही. उत्तर मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी शशिकांत त्रिपाठी यांनी पीटीआयला सांगितले की ही घटना मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास झाली. रेल्वे वाराणसी येथून अहमदाबादकडे निघाली होती. या घटनेत रेल्वचे २० डबे रुळावरून घसरले. घटनेची माहिती यंत्रणा दाखल झाल्या. मदतकार्य सुरू आहे.
Uttar Pradesh | Train number 19168, Sabarmati Express derailed in a block section between Kanpur and Bhimsen station. No injuries to anyone were reported from the site. Buses have reached the site to take the passengers to Kanpur: Indian Railways
(Source – Indian Railways) pic.twitter.com/vYGmTgDthv
— ANI (@ANI) August 17, 2024
कानपूर येथून निघाल्यानंतर थोड्याच वेळेत आम्हाला जोराचा आवाज ऐकू आला आणि डब्यातील सर्व काही हलायला लागले. आम्ही खूप घाबरलो होतो त्याचवेळी रेल्वे थांबल्याचे आमच्या लक्षात आले. या घटनेनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्सवर पोस्ट लिहिली. साबरमती रेल्वेचे इंजिन रेल्वे ट्रॅकवर ठेवलेल्या कोणत्या तरी वस्तूवर आदळले त्यानंतर रेल्वे रुळावरून घसरली. आयबी आणि उत्तर प्रदेश पोलीस घटनास्थळी तैनात आहेत. रेल्वेतील कुणीही प्रवासी जखमी झालेले नाही. प्रवाशांना त्यांच्या गंतव्य ठिकाणी जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
Parli Train Accident : परळीमध्ये रेल्वे अपघात, मेंढपाळासह 22 मेंढ्या जागीच ठार